Shirur News : शिरूर शहरातील (Shirur News)प्रलंबित नागरी सुविधांसह १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी सोमवारी सकाळपासून शिरूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद (Shirur News) मिळताना दिसत आहे.. सोमवारी सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. उपोषणस्थळी महिला कार्यकर्त्या, भाजप पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे शिरूर शहरासाठी (Shirur News) मंजूर असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक जागेचा परिपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा. यापूर्वी चुकीचा प्रस्ताव सादर करून रुग्णालयाच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम भूमिका प्रिया बिरादार यांनी घेतली आहे. Shirur News याशिवाय शिरूर शहर व तालुक्यात नागरिकांना आधार सेवेसाठी होणारा त्रास लक्षात घेऊन अधिकृत शासकीय आधार केंद्रे तात्काळ सुरू करावीत, सध्या कार्यरत सीएससी केंद्रांमधील शुल्क आकारणीमध्ये पारदर्शकता आणावी, तसेच बंद असलेल्या आधार केंद्रांबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. उपोषणस्थळी बोलताना प्रिया बिरादार म्हणाल्या, “शिरूरच्या नागरिकांना आरोग्य, प्रशासनिक सेवा आणि मूलभूत सुविधांसाठी वारंवार संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.” या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात दिवसभर चर्चेला उधाण आले होते. शहरातील विविध सामाजिक संघटना, महिला बचतगट तसेच नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.