Shikrapur News : खाकीचा दरारा! शिक्रापूर पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळून हस्तगत केले तब्बल 21 तोळे सोने आणि रोख रक्कम
चोरीला गेलेले कष्टाचे दागिने आणि रोख रक्कम पुन्हा मिळण्याची आशा धूसर होत असतानाच, शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur News) गुन्ह्यांचा कसून तपास करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आणि तब्बल २१ तोळे सोन्याचे दागिने व २२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

Shikrapur News : चोरीला गेलेले कष्टाचे दागिने आणि रोख रक्कम पुन्हा मिळण्याची आशा धूसर होत असतानाच, शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur News) गुन्ह्यांचा कसून तपास करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आणि तब्बल २१ तोळे सोन्याचे दागिने व २२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. याप्रकरणी योगेश रघुनाथ सपकाळे (रा. शिक्रापूर), हरीष कुंडलिक जगताप (रा. पेरणे गांव, ता. हवेली), आकाश गणेश ठाकुर (रा. शिक्रापूर), भगवान बाजीराव सातपुते (रा. शिक्रापूर), अभिजीत अवचर (रा. केंदूर), अमोल सोपान काळकुटे (रा. निमगाव म्हा.), विकास गव्हाणे (रा. डिंग्रजवाडी) आणि शरद दरेकर (रा. करंदी) यांच्या तक्रारींवरून पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली आणि चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल यशस्वीरित्या जप्त केला.
जप्त केलेला हा सर्व मौल्यवान मुद्देमाल पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात (Shikrapur News) विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते मूळ फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला.
याप्रसंगी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि गणेश बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. चोरीला गेलेले दागिने आणि कष्टाची कमाई पुन्हा हातात पडल्याने फिर्यादींच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आणि समाधान पाहायला मिळाले.
गुन्ह्याचा छडा लावण्यापासून ते जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार नवनाथ नाईकडे आणि महिला पोलीस अंमलदार अक्षदा पानमंद यांनी दाखवलेली तत्परता, चिकाटी आणि कर्तव्यनिष्ठा अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे.
केवळ आरोपींना गजाआड करणे एवढ्यावरच न थांबता, पीडितांना त्यांच्या हक्काची मालमत्ता परत मिळवून देणाऱ्या शिक्रापूर पोलिसांच्या (Shikrapur News) या कामगिरीचे सर्व स्तरांतून जोरदार कौतुक होत आहे.






