Pune District : शिरूर मुख्याध्यापक संघाचे विविध मागण्याबाबत तहसीलदारांना निवेदन
Pune District : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शिक्षकांच्या विविध न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

शिक्रापूर : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने राज्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठविण्यासाठी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले आले.
शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये टप्पा अनुदान, SIR मोहीम, बीएलओची शिक्षकांवरील जबाबदारी, रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, मराठी व अनुदानित शाळांचे अस्तित्व व टिकाव, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शिक्षकांच्या विविध न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे, सचिव बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश गावडे, विद्या सचिव विनोद शिंदे, संतोष दौंडकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभाग प्रमुख अनिल साकोरे, शरद आडुरकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम, विश्वस्त राजाराम ढवळे तसेच महिला प्रतिनिधी विमल झावरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.





