शिरूर : अखेर दाणेवाडीतील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली; कानातील बाळीमुळे झाला उलघडा

शिरूर : श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दाणेवाडी येथील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह १२ मार्च रोजी सापडला होता. मात्र, तो मृतदेह नेमका कोणाचा याबाबत ओळख पटत नव्हती. अखेर कानातील बाळीमुळे हा मृतदेह माऊली गव्हाणे याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतदेह पाहून गव्हाणे कुटुंबांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. एवढा काय गुन्हा या १९ वर्षीय मुलाने केला होता? एवढ्या निर्दयपणे आमच्या बाळाला माऊलीला मारले, असे म्हणत कुटुंबाने आक्रोश करत अश्रूला वाट मोकळी करून दिली.
१५ मार्च रोजी सकाळी बाजुलाच असणाऱ्या एका विहिरीमध्ये पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडे सापडले. ते उघडल्यानंतर गाठोड्यामध्ये दगडही टाकलेले आढळून आले. पोलिसांनी याची तपासणी केली असता गाठोड्यामधून दोन हात, पाय, व शीर (डोके) सापडले आहे. गेली चार दिवसांपासून हा धड असलेला मृतदेह नक्की कोणाचा आहे? यासाठी पोलीस प्रशासन तपास करत असताना दाणेवाडी येथील दुसऱ्या विहिरीमध्ये आज गाठोडे सापडले. त्यामुळे या खुणाचे गुड वाढत चालले असून नक्की एवढ्या निष्क्रिय आणि निर्दयीपणे खून करणारे नक्की कोण? हे आजही गुलदस्त्यात आहे. यामध्ये तरुणाचे शीर हात पाय हे अवयव सापडले आहेत.
पुणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे दोन दिवसापूर्वी एका विहिरीत हात, पाय आणि शीर कट केलेले अवस्थेतील एक धड आढळून आलं होतं. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत दाणेवाडी गावातून मिसिंग झालेला १९ वर्षांचा माऊली गव्हाणेच आहे का? या अनुषंगाने तपास सुरू केला होता. माऊली गव्हाणे हा ७ मार्चला शिरूर येथे बारावीच्या पेपरसाठी आल्यानंतर मिसिंग झाला होता.
त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता. अखेर या दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये आढळलेले शीर आणि धड याची ओळख पटली असून माऊली गव्हाणे या १९ वर्षीय तरुणाचाच हा मृतदेह असून माऊलीची एवढ्या कृर निरघृपने हत्या कोणी केली या घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षाच्या चिमुकल्याचे हात-पाय कट करून अमानुषपणे हत्या केली जाते हे धक्कादायक आहे.
ज्यांनी हा खून केला आहे हा मोठ्या सीताफीने व डोक्याने केला असल्याचे दिसून आले आहे. मृतदेह व त्याचे हात पाय हे अत्याधुनिक कटरने कापून धड व इतर अवयव वेगवेगळ्या पोत्यात भरून वेगवेगळ्या विहिरीत व दाणेवाडी याच गावात टाकले आहे. या खुनातील आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ व मृत माऊली गव्हाणे याच्या कुटुंबाने केली आहे.





