शिरूर | आमदार पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी शिंदोडी, निमोणेत सर्वपक्षीय निषेध

Updated On:
शिरूर | आमदार पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी शिंदोडी, निमोणेत सर्वपक्षीय निषेध

निमोणे (प्रतिनिधी) :- शिरुर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्यासह त्यांना कुटुंबातील व्यक्तींना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे, शिंदोडी, गुनाट या गावात सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर सभा घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच असे भ्याड कृत्य करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना लवकरात अटक करावी अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली.

निमोणे गावचे सरपंच शामकांत काळे म्हणाले, आमदार अशोक पवार यांनी शिरुर-हवेलीत मोठया प्रमाणात विकासकामे सुरु केली असल्याने काही समाजकंटकांना हि गोष्ट खटकत असल्याने त्यांनी अश्या प्रकारे आमदारांना धमकी दिली आहे. परंतु शिरुर-हवेलीतील संपुर्ण जनता आमदारांच्या सोबत असुन त्यांनी त्यांचे काम असेच पुढे चालू ठेवावे.

भाजपचे जालिंदर काळे म्हणाले, राजकारणात वैचारिक विरोध असावा. तसेच समोरासमोर विरोध करावा असा भ्याडासारखा पाठीमागून विरोध करत आणि निनावी पत्र पाठवून धमकी देणं हे निंदनीय आहे. शिरुर तालुक्यात यापुर्वी अशा प्रकारचं राजकारण यापुर्वी कधीही झालेलं नाही.

शिवसेनेचे आनंदराव ढोरजकर म्हणाले, आमदारांच काम चांगलं असुन त्यांनी अशा लोकांचा विचार न करता त्यांचे काम चालूच ठेवावे. ग्रामपंचायत सदस्य संजय काळे म्हणाले, आमदार अशोक पवार हे सर्वसामान्य लोकांच्यासाठी रात्रंदिवस झटत असुन तालुक्याचा विकास करतांना अशा प्रकारच्या धमक्या देणं म्हणजे विकासकामांना खीळ घालण्याचाच हा प्रकार आहे.

गावचे माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, अमोल थोरात, दिलीप काळे, ग्रा.पं.सदस्य प्रशांत अनुसे, संदीप गव्हाणे, शरदभाऊ काळे, अंकुश जाधव ,ज्येष्ठ नेते माऊली काळे, शशिकांत काळे, राहुल पवार, धोंडीभाऊ कोळपे, रवी गडकर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा दरम्यान व्हिडिओ कॉल द्वारे आमदार अशोक पवार यांनी निमोणे ग्रामस्थांचे आभार मानले.

आणखी संबंधित बातम्या

अग्रलेख : अस्वस्थ समाज मन

2026-09-08 06:00:31

अग्रलेख : अस्वस्थ समाज मन

Shirur News : शिरूर पालिकेचे कुजलेले पाईप गेले कुठे? चोरीच्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु

2026-09-05 17:48:34

Shirur News : शिरूर पालिकेचे कुजलेले पाईप गेले कुठे? चोरीच्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु

Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण

2026-09-05 16:03:35

Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण

Newasa News : नेवाशात भटक्या कुत्र्यांचा हैदोस! प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण, क्रिकेट पॅड लावून अनोखा निषेध

2026-09-03 19:18:43

Newasa News : नेवाशात भटक्या कुत्र्यांचा हैदोस! प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण, क्रिकेट पॅड लावून अनोखा निषेध

Shirur News : शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिरूर डी.बी. पथकाकडून दोघांना अटक

2026-09-03 18:23:03

Shirur News : शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिरूर डी.बी. पथकाकडून दोघांना अटक