काळी पडलेली चांदी चमकवा
Updated On:

आपल्याकडे चांदीपेक्षा सोन्याला जास्त “भाव’ असला तरी काही दागिने फक्त चांदीचेच असतात. त्यामुळे चांदीही “भाव’ खाते. मात्र चांदीचे दागिने काही काळाने काळी पडतात. त्यामुळे असे दागिने घालणे कमीपणाचे वाटते.
काळी पडलेली चांदी कितीही घासली तरी तिचा काळपटपणा जात नाही. अशावेळी काही साधेसोपे उपाय केल्यास चांदीही “सोन्या’सारखी चमकेल. टूथपेस्ट हा दागिने साफ करण्यासाठी घरगुती उपाय आहे.
टूथपेस्ट चांदीवर लावून गरम पाण्याने धुतले तरी काळपटपणा दूर होईल. बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळून त्याची पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर लावून कपड्यानं पुसा. मीठानेही चांदीच्या वस्तू साफ होतात. चांदीच्या वस्तू प्लॅस्टिकमध्ये आणि गरम वस्तूच्या जागी ठेवणे टाळावे. चांदीचे दागिने साफ करण्यासाठी केमिकल वापरू नका.





