Eknath Shinde: सहा खासदारांच्या एन्ट्रीने मोदी सरकारमध्ये वाढली शिंदेंची पॉवर; दोन खासदारांना थेट मंत्रीपद मिळणार?
Eknath Shinde: एनडीएमध्ये शिवसेनेचे संख्याबळ आता 13

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली, ती म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. अखेर ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी अधिकृतरित्या उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आता एनडीएमध्ये शिवसेनेचे संख्याबळ 13 झाले असून, त्यांची पॉवर वाढली आहे.
त्यातच आता 5 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन होणार आहे, त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणार असून त्या पदासाठी ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंच्या पक्षात आलेल्या दोन खासदारांची नावे चर्चेत आहेत. (Eknath Shinde)
वाढलेल्या खासदार संख्येनुसार, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री असे एकूण २ मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रिपद श्रीकांत शिंदे यांना मिळू शकते तर केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून असेलल्या दोन खासदारांची नावे चर्चेत आहेत.
दीड-दीड वर्षे मंत्रिपद (Eknath Shinde)
यामध्ये दोघांना दीड दीड वर्षे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सुरुवातीचे दीड वर्ष परभणीचे खासदार संजय जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर उर्वरित दीड वर्षांसाठी धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.
सध्या बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत. आता या खासदारांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेसेनेला लॉटरी लागणार आहे. (Eknath Shinde)
हेही वाचा:






