आत्मविश्वास कमी झालेले शिंदे सरकार – पाटील

नगर – महाविकास आघाडी सरकारच्या काळातच एपीसीला नोकर भरती करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भरतीसाठी परिक्षा झाल्या होत्या. आता त्या परिक्षांचा निकाल जाहिर झाला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची निवड झाली. त्यांना हे सरकार नियुक्ती पत्र देत आहे. आघाडी सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण करू भरती केली.
पण आता हे शिंदे सरकार जनमतामध्ये वाढलेला दोष कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नियुक्ती पत्राचा दिखावा करीत आहे.यापूर्वी राज्यात कसे कधीच झाले नाही. नियुक्तीपत्राची जाहिरात कराची वेळी या सरकारवर आली आहे. त्याचा अर्थ या सरकारचा आत्मविश्वास कमी झाला असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शिर्डी 4 व 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, प्रदेशचे घनश्याम शेलार आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. प्रशासनाला देखील माहिती आहे की हे सरकार फारकाळ टिकणार नाही.
त्यामुळे अधिकारी देखील काम टाळत असल्याचे दिसत आहे.त्या आमदार दुसऱ्या आमदारांवर खोक्याचे आरोप करीत असेल आणि आपल्या आमदार खोके घेतो, हे जनतेला पडले नाही. त्यामुळे या आमदारांची आता कोंडी झाली आहे. 75 हजार नोकऱ्याच्या नियुक्ती पत्राच्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतांना महाराष्ट्रबाहेर जे प्रकल्प गेले.
त्यामुळे चार लाख रोजगार गेला. त्यामुळे या सरकार वैचारिक दिवाळखोरी वाढली असल्याचे दिसत असल्याचा आरोप करून पाटील म्हणाले की, सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहिर करणे अपेक्षित होते. आता पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेला विलंब होऊन अधिक संकटात सापडलेले शेतकरी आता पुन्हा सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आणखी संकटात जाणार आहे.
अधिवेशनानंतर सरकार पडते या विखेंच्या मताशी सहमत
-शिर्डीत कॉंग्रेसचे अधिवेशन झाले, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले. आता राष्ट्रवादीचे शिर्डी अधिवेशन झाल्यानंतर राष्ट्रवादी फुटेल अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली होती. त्यावर पाटील म्हणाले की, आपल्या गावाचा असा पायगुण आहे हे सांगितल्याबद्दल त्यांचे कौतूकच आहे. पण त्याच्या मताशी मी सहमत आहे. ज्या पद्धतीने कॉंग्रेसच्या अधिवेशननंतर आघाडी सरकार पडले. तसेच आता राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर हे शिंदे सरकार पडेल.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटात फूट
-शिंदे गटाचे आमदार सध्या तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात नाही. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकारला दाखवून देऊ असे काही आमदार बोलले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे गटात फुट पडेल, असे पाटील म्हणाले.





