Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीने दिला जबाब, म्हणाली पती राजमुळेच…

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर पॉर्न व्हिडिओ बनविल्याप्रकरणी आरोप असून याप्रकरणी राज पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार राज कुंद्रा विरोधात पुरावे मिळाले आहेत. एवढेच नाही तर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा यामध्ये समावेश असून यासंदर्भात मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपास करित आहे.
दरम्यान शिल्पाने जबाब दिला आहे. यामध्ये तिने आवाहन केले आहे की, अर्धवट माहितीच्या आधारे तिली व तिच्या कुटुंबावर कोणताही आरोप न लावला जावा. तसेच याप्रकरणी आपल्याला नक्कीच न्याय मिळेल असे अभिनेत्रीने सांगितले आहे.
अभिनेत्री म्हणाली की, गेले काही दिवस आमच्यासाठी प्रत्येक बाबतीत आव्हानात्मक होते. आमच्यावर अनेक आरोप झाले आहेत. माध्यमांनी माझ्यावर बरेच अन्यायकारक आरोप केले. ट्रोल केले गेले, केवळ मीच नाही तर माझ्या कुटुंबानेही या सर्व गोष्टींचा सामना केला. मी अद्याप या प्रकरणी कोणतेही विधान केलेले नाही.
मी सध्या या प्रकरणावर टिप्पणी करणार नाही कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. म्हणून कृपया माझ्याविषयी खोटे कोट देणे थांबवा. एक सेलिब्रिटी म्हणून, मी कधीही तक्रार करू नका, वा खुलासा करु नका असे म्हणाले नाही.
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे, अजून तपास सुरू आहे. माझा मुंबई पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही कायदेशीर मदत घेत आहोत पण तोपर्यंत मी तुम्हाला विनंती करते, विशेषतः एक आई म्हणून, आमच्या मुलांसाठी आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घ्या. सत्य जाणून घेतल्याशिवाय अपूर्ण माहितीवर टिप्पणी करू नका.
शेवटी शिल्पा शेट्टी लिहिते की, ‘मी कायद्याचे पालन करणारी भारतीय आणि गेल्या 29 वर्षांपासून काम करणारी एक व्यावसायिक महिला आहे.लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी कधीही कोणाचा विश्वास तोडला नाही. मी तुम्हाला विनंती करते की, या काळासाठी आम्हाला एकटे सोडा. कृपया न्यायालयाला आपले काम करु द्या. सत्यमेव जयते.





