प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत समोरील पुणे नगर महामार्गावरून चंद्रकला कळसादकर या ज्येष्ठ महिला रस्ता ओलांडत असताना पुण्याकडून आलेल्या (एम एच १४ के ए ९०९८) या ट्रकची धडकेत त्यांचा मृत्यू झाला. ट्रकची बसून चंद्रकला गंभीर जखमी झाल्या, दरम्यान नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. चंद्रकला मनोहरराव कळसादकर (वय ६२, सध्या रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा, ता. शिरूर, मूळ रा. पेठशिवानी ता. पालम, जि. परभणी) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत नंदकिशोर विठ्ठलराव पिंपळे (वय ३७, रा. कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी नरबहाद्दूर लालाबहाद्दूर थापा (वय ५३, रा. इंद्रायणीनगर भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार उद्धव भालेराव करत आहेत.