Shikhar Sophie Video : ‘अब्बा डब्बा जब्बा…’, शिखर धवन गर्लफ्रेंड सोफीच्या हिंदीने चकित, VIDDEO होतोय व्हायरल

Shikhar Dhawan and Sophie Shine Funny video Viral : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आजकाल तो त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइनमुळेही चर्चेत आहे. खरं तर, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धवनने आयर्लंड नागरिक सोफीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची पुष्टी केली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “मेरी जान.” आता, त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो तिच्या हिंदीवर चिडलेला दिसतो.
शिखर धवन-सोफी शायनचा व्हिडीओ व्हायरल –
शिखर धवन अनेकदा सोशल मीडियावर मजेदार रील बनवतो. हा व्हिडीओ देखील असाच आहे, ज्यामध्ये माजी क्रिकेटपटूने एका चित्रपटातील डायलॉग लिप-सिंक केला आहे. व्हिडीओमध्ये धवन सोफीला विचारतो, “तू एका प्रश्नाचे प्रेमाने उत्तर देशील का?” यावर सोफी म्हणते कोणता प्रश्न, ज्यावर धवन तिला तिचे नाव विचारतो. यानंतर सोफी लाजून निघून जाते, धवन पुन्हा तोच प्रश्न विचारतो. मग काय, विनोदी डायलॉग बोलताना सोफी म्हणते, “अब्बा डब्बा जब्बा.”
View this post on Instagram
सूर्यकुमार यादवने व्हिडीओवर दिल्ली प्रतिक्रिया –
हा डायलॉग ‘जुदाई’ चित्रपटातील आहे. सोफी आणि धवनचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही मजेदार रील शेअर करताना शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला माहित नाही की ती कोणती हिंदी शिकली आणि इथे आली.” सूर्यकुमार यादवने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. हसणारा इमोजी शेअर करत त्याने लिहिले, “शिखी पा यार.” सूर्या व्यतिरिक्त अनेक क्रिकेटपटूंना हा मजेदार व्हिडीओ आवडला आहे.
हेही वाचा – GT vs LSG : लखनौचे नवाब गुजरातवर पडले भारी! मिचेल मार्शच्या शतकानंतर विल्यम ओरोर्केचा धुमाकूळ
शिखर धवनची गर्लफ्रेंड सोफी काय करते?
शिखर धवनची गर्लफ्रेंड सोफी शाइन आयर्लंडची आहे. ती बऱ्याच काळापासून दुबईत राहत होती. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धवनसोबत भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ती आली होती. सोफी एका मोठ्या कंपनीत उत्पादन सल्लागार आहे. धवनसोबतच्या तिच्या नात्याची बातमी येण्यापूर्वी तिचे ५० हजारांपेक्षा कमी फॉलोअर्स होते, आता तिचे १ लाख ८० हजार फॉलोअर्स आहेत.





