Shikhar Dhawan : शिखर धवनने रजत आणि असीमच्या भांडणात घेतली उडी, VIDEO होतोय व्हायल

Shikhar Dhawan stops Rajat Dalal and Asim Riaz fight : सध्या सर्वांचे लक्ष आयपीएल २०२५ च्या हंगामावर केंद्रित आहे. या टी-२० लीगमध्ये भारतासह जगभरातील क्रिकेट स्टार आपली प्रतिभा दाखवत आहेत. त्याच वेळी, काही माजी क्रिकेटपटू त्यात भाष्य करून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. पण टीम इंडियाचा माजी दिग्गज सलामीवीर शिखर धवन यावेळी आयपीएलचा भाग नाही. अशा परिस्थितीत काही चाहते त्यालाही मिस करत आहेत. मात्र, शिखर धवन अजूनही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जत दलाल आणि असीम रियाझचे भांडण –
सोशल मीडियावर व्हायरल होत असेलल्या व्हिडीओमध्ये शिखर धवन भांडण सोडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम आणि एक्सवर खूप चर्चेत आहे. हा व्हिडिओ एका पत्रकार परिषदेचा आहे, ज्यामध्ये अचानक दोन लोकांमध्ये हाणामारी झाली. हे दोघे दुसरे तिसरे कोणी नसून सोशल मीडिया सेलिब्रिटी रजत दलाल आणि असीम रियाझ आहेत, जे बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोद्वारे लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.
शिखर धवनने सोडवले भांडण –
Kalesh b/w #RajatDalal and #AsimRiaz at a press conference pic.twitter.com/AKFh1jness
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 29, 2025
पत्रकार परिषदेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दोघेही आपापल्या जागेवरून उठले आणि एकमेकांसमोर उभे राहिले. यावेळी, धवन देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होता आणि तो देखील लगेच उठला आणि दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वेगळे करून परिस्थिती शांत केली. परंतु, या भांडणात किती तथ्य होते हे सांगणे कठीण आहे. कारण ते एका नवीन रिअॅलिटी शोच्या पत्रकार परिषदेदरम्यान घडले आहे.
हेही वाचा – CSK vs RCB : ‘तो लवकर आला, खरंतर तो…’, सीएसकेच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागने उडवली धोनीची खिल्ली
भांडण खरं की खोटं?
खरंतर, एका प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवीन फिटनेस रिअॅलिटी शो सुरू होत आहे, ज्यामध्ये ४ संघ सहभागी होत आहेत. यापैकी दोन संघांचे मार्गदर्शक म्हणून रजत आणि असीम यांचा समावेश आहे. धवन यामध्ये पर्यवेक्षकाची भूमिका साकारणार आहे. अशा परिस्थितीत, हे भांडण केवळ कृत्रिम आणि शोच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचे दिसते. तरीसुद्धा, सध्या त्याचा व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे आणि चाहतेही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा – CSK vs RCB : सीएसकेला आरसीबीविरुद्धचा पराभव पडला महागात! नावावर झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
निवृत्तीनंतरही शिखर धवन सक्रिय –
धवनबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या हंगामापर्यंत पंजाब किंग्जचा कर्णधार असलेल्या या अनुभवी फलंदाजाने २०२४ मध्येच निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच नाही तर आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत, यावेळी चाहत्यांना आयपीएलमध्ये ‘गब्बर’ची आठवण येत आहे. परंतु, धवन माजी क्रिकेटपटूंच्या गटात खेळून चाहत्यांचे सतत मनोरंजन करत आहे.





