Shikhar Dhawan Engaged : ‘गब्बर’च्या आयुष्यात ‘सोफी’ची एन्ट्री! एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी

Shikhar Dhawan engaged with Sophie Shine : भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन याने आपल्या आयुष्यातील एका नवीन इनिंगला सुरुवात केली आहे. शिखरने आपली गर्लफ्रेंड सोफी शाइन (Sophie Shine) हिच्याशी साखरपुडा केला आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोंमध्ये हे जोडपे आपली एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे.
“एकसारखी स्वप्ने अन् कायमची सोबत…”
साखरपुड्याचे फोटो शेअर करताना शिखरने अत्यंत भावूक कॅप्शन लिहिले आहे. त्याने म्हटले की, “एकसारख्या हास्यापासून ते एकसारख्या स्वप्नांपर्यंतचा हा प्रवास. आम्ही कायम सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या साखरपुड्यानिमित्त मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल आम्ही ऋणी आहोत.” शिखरचे हे दुसरे लग्न असणार आहे.
कोण आहे सोफी शाइन?
View this post on Instagram
शिखर धवनची होणारी पत्नी सोफी शाइन ही मूळची आयरिश (आयर्लंड) आहे. तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी:
- शिक्षण: तिने आयर्लंडमधील लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.
- करिअर: सोफी सध्या अबू धाबीमध्ये ‘नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन’ची सेकंड व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे.
- चर्चा: सोफी पहिल्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान शिखरसोबत दिसली होती, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.
हेही वाचा – Wasim Akram Revealed : “मला बसखाली फेकून देणार होते…”; वसीम अक्रमचा सहकाऱ्यांबद्दल खळबळजनक खुलासा
शिखर धवनचे वैयक्तिक आयुष्य –
शिखर धवनचे पहिले लग्न २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आयशा मुखर्जी हिच्याशी झाले होते. त्यांना जोरावर नावाचा मुलगा आहे. मात्र, २०२१ मध्ये ते वेगळे झाले आणि २०२३ मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला.
हेही वाचा – Mohammad Rizwan : रिझवानने पाकिस्तानची काढली लाज! लाईव्ह सामन्यात कर्णधाराने मैदानातून हाकललं, पाहा VIDEO
‘गब्बर’ची शानदार क्रिकेट कारकीर्द –
भारतीय क्रिकेटमध्ये ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखरने ऑगस्ट २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने भारतासाठी ३४ कसोटी, १६७ वनडे आणि ६८ टी-२० सामने खेळले. २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देण्यात आणि २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा काढण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.





