Wasim Akram Revealed about 1996 WC : पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार वसीम अक्रमने आपल्याच जुन्या सहकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाने आपल्याला ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा आणि संपूर्ण दोष आपल्यावर ढकलण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक खुलासा अक्रमने एका टीव्ही शोमध्ये केला आहे. नेमकं काय होतं १९९६ चं प्रकरण? १९९६ च्या वर्ल्ड कपचा उपांत्यपूर्व सामना बंगळुरू येथे भारत आणि पाकिस्तान दरम्यान खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे, तत्कालीन कर्णधार वसीम अक्रम दुखापतीमुळे या सामन्यात खेळला नव्हता. ३० वर्षांनंतरही अक्रमवर असा आरोप केला जातो की, त्याने पराभवाच्या भीतीने ऐनवेळी माघार घेतली होती. “अक्रमला बसखाली फेकून देऊया…” अक्रमने ‘बताना ही पडेगा’ या शोमध्ये या घटनेवर भाष्य करताना म्हटले की, “भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडू जनतेच्या रोषाला घाबरले होते. मी माझ्या कानांनी ऐकले होते, एका खोलीत ५-६ खेळाडू बसले होते. मी बाहेरून जात असताना एक जण म्हणाला की, ‘सर्व दोष अक्रमवर टाकूया आणि त्याला बसखाली फेकून देऊया (म्हणजेच सर्व रोष त्याच्यावर वळवूया), नंतर काय होईल ते बघू.’ अक्रमने पुढे सांगितले की, या कटात त्याचा स्वतःचा उपकर्णधारही सामील होता. हेही वाचा – Mohammad Rizwan : रिझवानने पाकिस्तानची काढली लाज! लाईव्ह सामन्यात कर्णधाराने मैदानातून हाकललं, पाहा VIDEO “मैदानावर उतरण्यासाठी ४ इंजेक्शन घेतले होते” स्वतःला अनफिट जाहीर करण्याच्या आरोपावर अक्रम म्हणाला की, “बॉस, ते काही गल्ली क्रिकेट नव्हते. मी पाकिस्तानचा कर्णधार होतो आणि तो सामना भारताविरुद्ध भारताच्याच भूमीवर होता. मी शेवटच्या क्षणी मागे हटलो असतो असं तुम्हाला वाटतं का? मी त्या दिवशी सकाळी वेदनाशामक ४ इंजेक्शन्स घेतली होती, पण स्नायू दुखावले गेल्याने मला चेंडू फेकणे अशक्य होते. ती दुखापत बरी होण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागत होता.” हेही वाचा – Team India Record : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘या’ बाबतीत क्रिकेट विश्वात ठरला नंबर १ संघ चाहत्यांचा संताप अन् अक्रमची वकिली – १९९६ च्या त्या सामन्यात अक्रम न खेळल्याने पाकिस्तानमध्ये त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. आजही ३० वर्षांनंतर अक्रमला आपल्या निष्ठेचा पुरावा द्यावा लागतो. याउलट त्याने १९९२, १९९९ आणि २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध जीव तोडून गोलंदाजी केली होती, पण चाहत्यांच्या मनात १९९६ चा तो सामना अजूनही सलत आहे.