Shikhar Bank scam: अखेर शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद; अजितदादांसह सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांना क्लीनचिट
Shikhar Bank scam: याप्रकरणी तपास यंत्रणेला ठोस फौजदारी पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने फाईल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Shikhar Bank scam: राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने मंजूर केला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) कथित 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात कोणतीही फसवणूक किंवा अपहार करण्याचा अर्जदारांचा हेतू दिसून येत नाही, असे नमूद करत मुंबईतील विशेष न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. Shikhar Bank scam
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ७० हून अधिक माजी संचालकांवर आरोप करण्यात आले होते. यात राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांचा समावेश होता. Shikhar Bank scam
याप्रकरणी तपास यंत्रणेला ठोस फौजदारी पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने फाईल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणात सादर केलेला ‘सी-समरी’ (Closer Report) अधिकृतपणे स्वीकारला आहे. या निर्णयामुळे पवार कुटुंबासह संबंधित सर्व नेत्यांना कायदेशीर प्रक्रियेतून क्लीनचीट मिळाली आहे. Shikhar Bank scam
न्यायालयाने काय म्हंटले?
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, ज्यावर निकाल देताना विशेष न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी किंवा फसवणुकीचा हेतू दिसून येत नाही.
तसेच, बँकेच्या संचालकांमध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी पूर्वनियोजित कट किंवा संगनमत झाल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला सापडलेले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
नेमके प्रकरण काय?
सन २००२ ते २०१७ या कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी शिखर बँकेची कर्जे थकवल्यामुळे बँकेला सुमारे २५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप होता. कर्ज वसुलीच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSCB) हे साखर कारखाने आणि त्यांच्या जमिनी कवडीमोल भावात लिलावात विकल्याचा आरोप करण्यात आला होता. Shikhar Bank scam:
ज्यामुळे बँकेचे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात अजित पवार यांच्यासह ७० हून अधिक माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात आला होता.
विशेष म्हणजे, बहुतांश व्यवहार बँकेच्या प्रमुखपदी असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांशीच झाल्याचा आरोप होता. तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हे प्रकरण मोठा घोटाळा म्हणून लावून धरले होते.
हेही वाचा:
Jalna Gas Cylinder: आता थेट गॅस सिलेंडरची चोरी; जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले






