Shevgaon News : तुजारे यांच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत; आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
शेवगाव तालुक्यातील (Shevgaon News) वरुर येथील देविदास तुजारे या तरुणाचा विद्युत खांबावर वीज जोडणीचे काम करत असताना वीज प्रवाह अचानक सुरू झाल्याने विजेचा शॉक बसून मृत्यू झाला.

Shevgaon News : शेवगाव तालुक्यातील (Shevgaon News) वरुर येथील देविदास तुजारे या तरुणाचा विद्युत खांबावर वीज जोडणीचे काम करत असताना वीज प्रवाह अचानक सुरू झाल्याने विजेचा शॉक बसून मृत्यू झाला.
अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी (Shevgaon News) करण्यात आलेल्या आंदोलनाची प्रशासनाने सकारात्मक दखल घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तुजारे कुटुंबीयांना चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे .
देविदास तुजारे यांचा ११ जून रोजी विद्युत खांबावर वीज जोडणीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला होता. ते महावितरणचे नियमित कर्मचारी नसले तरी अनेक वर्षांपासून वायरमनसोबत काम करत होते. घरातील तरुण कर्त्या पुरुषाच्या अचानक झालेल्या निधनामुळे तुजारे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी पुढाकार घेत तुजारे कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करत अधिकाऱ्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी करण्यात ‘आली. या आंदोलनाला ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला.
या पाठपुराव्याची दखल घेत महावितरण प्रशासनाने तातडीने निर्णय घेत चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रा. किसन चव्हाण यांच्या हस्ते तुजारे कुटुंबीयांना धनादेश (Shevgaon News) प्रदान करण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांमधूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.






