Prem Bhati Death : रीलस्टार प्रेम भाटी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर
कल्याणमधील मोहने परिसरात प्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी (Prem Bhati Death) याच्या दुचाकी अपघातातील मृत्यू प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर कारवाई केली आहे.

Prem Bhati Death : कल्याणमधील मोहने परिसरात प्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी (Prem Bhati Death) याच्या दुचाकी अपघातातील मृत्यू प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर कारवाई केली आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या (Prem Bhati Death) उपाययोजना न करता निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संबंधित तीन कंत्राटदारांविरोधात (ठेकेदारांविरोधात) गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात प्रशासकीय आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळेच हा जीवघेणा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रस्त्यावरील खडी ठरली जीवघेणी
रीलस्टार प्रेम भाटी (Prem Bhati Death) हा रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मोहने परिसरातून जात होता. यादरम्यान रस्त्यावर दुरुस्तीच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या खडीवरून त्याची दुचाकी अचानक घसरली. दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने त्याचा अत्यंत गंभीर अपघात झाला. या अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे प्रेम भाटी याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांसह कल्याण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा
या प्रकरणाच्या तपासादरम्यान काल पोलिसांच्या हाती घटनास्थळाचे एक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज लागले होते. या व्हिडिओमध्ये प्रेम भाटी रात्री उशिरा दुचाकीवरून जात असताना, रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे त्याची दुचाकी घसरून भीषण अपघात झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आज मंगळवारी थेट कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारला.
3 ठेकेदारांवर गुन्हा दाखल
खडकपाडा पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित ठिकाणी वाहनचालकांसाठी कोणतेही दिशादर्शक किंवा इशारा देणारे फलक (Signboards) लावले नव्हते. तसेच, अपघात टाळण्यासाठी बॅरिकेड्स अथवा इतर कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली नव्हती. रस्त्यावर खडी टाकून ती तशीच उघडी सोडून देण्यात आली होती.
वाहनचालकांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत खडकपाडा पोलिसांनी कंत्राटदार निकी मोटवाणी, महेश भोईर आणि गणेश पाटील या तिघांविरोधात निष्काळजीपणाचा आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
रस्ते विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांचे बळी किती?
या घटनेमुळे विकासकामांच्या नावाखाली रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांकडून सुरक्षेच्या नियमांचे किती उल्लंघन केले जाते, हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाचे या ढिसाळ कारभारावर नियंत्रण (Prem Bhati Death) आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.






