इस्रायलच्या हल्ल्यानंतर घाम पुसताना दिसला हिजबुल्लाचा नेता ; म्हणाला,”नेतन्याहूचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही”‘

Sheikh Naeem Qasim । इस्रायली सैन्य हिजबुल्लाचा कहर करत आहे. इस्रायली सैन्य लेबनीजच्या सीमेत घुसल्यावर पेजर आणि वॉकीटॉकी हल्ल्यानंतर चीफ हसन नसरल्लाहच्या खात्माच्या धक्क्यातून हिजबुल्ला अजून सावरला नव्हता. दरम्यान, हिजबुल्लाच्या उपनेत्याचा एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये तो घाम पुसताना दिसत आहे.
हिजबुल्लाचे उपनेते शेख नईम कासिम यांनी हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर त्यांचे पहिले सार्वजनिक वक्तव्य दिले. या अगोदर रेकॉर्ड केलेल्या वक्तव्यात कासिमने म्हटले आहे की, इस्रायली सैन्याच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत” असे म्हटले.
त्याचा हा व्हिडिओ इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसण्यापूर्वीचा आहे. जर इस्रायलने आमच्या भूमीत प्रवेश केला तर आम्ही पूर्ण तत्परतेने त्याचा मुकाबला करू, असे ते म्हणाले. या पूर्व रेकॉर्ड केलेल्या निवेदनात कासिमने म्हटले आहे की, लेबनॉनमध्ये आमचे कमांडर आणि नागरिकांचा मृत्यू झाला तरी आम्ही झुकणार नाही. आम्ही गाझाच्या लेबनॉनच्या संरक्षणाला पाठिंबा देत राहू.” असेही त्यांनी यावेळी म्हटले
शेख नईम कासिम घामेघूम Sheikh Naeem Qasim ।
दरम्यान, व्हिडिओमध्ये कासिम सतत घाम पुसताना दिसत होता. हिजबुल्लाह नसराल्लाह यांच्या पावलावर पाऊल ठेवत राहू, असेदेखील त्याने म्हटले. हिजबुल्लाचे लोक नसराल्लाहच्याच मार्गावर पुढे जात राहतील. कासिम म्हणाले की हे युद्ध दीर्घकाळ चालू शकते. आम्हाला खात्री आहे की इस्रायल आणि नेतान्याहू त्यांच्या योजना यशस्वी होणार नाहीत. हिजबुल्लाह पुन्हा एकदा 2006 प्रमाणेच इस्रायलचा पराभव करेल.
नरसंहार करून आपण यशस्वी होऊ शकतो असे इस्रायलला वाटत असेल तर तो भ्रमात जगत आहे, असे ते म्हणाले. लोकांवर बॉम्बफेक करून आणि निरपराधांचे रक्त सांडून IDF आपले उद्दिष्ट साध्य करणार नाही.
हिजबुल्लाह इस्रायलविरुद्ध पुन्हा लढा देणार Sheikh Naeem Qasim ।
यादरम्यान कासिम यांनी विश्वास व्यक्त केला की, हिजबुल्लाह पुन्हा उभा राहील आणि इस्रायलविरुद्ध लढा देईल आणि विजय नोंदवेल. नसरल्लाह यांच्यानंतर हिजबुल्लाहच्या नव्या प्रमुखाबाबत ते म्हणाले की, आमच्याकडे नेते निवडण्याची व्यवस्था आहे, त्या आधारे लवकरच नवीन प्रमुखाची निवड केली जाईल.
इस्रायलच्या हल्ल्यावर टीका करताना कासिम म्हणाले की, “लेबनीज गावे आणि निवासी भागांना आयडीएफने लक्ष्य केले आहे. इस्रायल ज्यांच्यावर बॉम्बफेक करत आहे ते हिजबुल्लाचे लढवय्ये नसून निष्पाप नागरिक आहेत.”





