Sheikh Hasina Son Warns | बांगलादेशात देशव्यापी आंदोलन व हिंसाचार या घटनांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडण्याचा निर्णय घेतला. हसीना सरकार कोसळल्यानंतर मोहम्मद युनूस सध्या बांगलादेशच्या हंगामी सरकारचे सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. याशिवाय शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाला निवडणुकीत सहभाग घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सध्या बांगलादेशमधील सामाजिक व आर्थिक परिस्थिती अस्थिर असून त्याचे पडसाद भारतावर उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचदरम्यान, शेख हसीना यांचे पुत्र अर्थात साजीब वाझेद यांनी भारताला गंभीर इशारा दिला आहे. “बांगलादेशच्या सीमेपलीकडून भारतात दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू होतील. आवामी लीगच्या सरकारने आपल्या काळात भारताला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमा दहशतवादापासून सुरक्षित ठेवल्या होत्या, पण आता पुन्हा बांगलादेशातून भारतात दहशतवादी कारवाया सुरू होतील, असा इशारा साजीब वाझेद यांनी दिला आहे. Sheikh Hasina Son Warns | नेमकं काय म्हणाले साजीब वाझेद ? साजीब वाझेद यांनी बांगलादेशमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. “भारतासाठी ही परिस्थिती भयंकर चिंतेची आहे. आमच्या आवामी लीग सरकारने भारताच्या पूर्वेकडच्या सीमांना लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमा दहशतवादमुक्त ठेवल्या होत्या. त्याआधी बांगलादेशचा वापर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठीचा तळ म्हणून केला जात होता. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होईल,” असं वाझेद म्हणाले. दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार स्फोटामागे बांगलादेशमधील लष्कर-ए-तय्यबाचा हात असल्याची माहिती मला संरक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिल्याचा दावाही साजीब वाझेद यांनी केला आहे. Sheikh Hasina Son Warns | याशिवाय आवामी लीग व जातीय पार्टी या बांगलादेशातील दोन मोठ्या पक्षांना निवडणुकीत सहभाग घेण्यापासून रोखल्यामुळे बांगलादेशमधील निम्म्या लोकसंख्येचा निवडणुकीचा अधिकारच हिरावून घेतला गेला आहे. हा देश लवकरच विभागला जाणार आहे, अशी भीती यावेळी साजीब वाझेद यांनी व्यक्त केली. शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करण्याची मागणी बांगलादेशमधील विद्यमान सरकारने भारताकडे शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप भारताने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. यासंदर्भात साजीब वाझेद यांनी कोणत्याही वैध प्रत्यार्पणासाठी नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पाडली जायला हवी. माझ्या आईला येथील न्यायालयात खटला चालवण्यासाठी स्वत:चा वकील नेमण्याचीही परवानगी नाकारली गेली. त्यामुळे भारतानं बांगलादेश सरकारच्या विनंतीवर काहीही करणं मला अपेक्षित नसल्याचे वाझेद म्हणाले. Sheikh Hasina Son Warns | हेही वाचा: Sreeleela Instagram Post: AI डीपफेकवर अभिनेत्री श्रीलीलाचा संताप, फेक कंटेंटला प्रोत्साहन देऊ नका म्हणत केले आवाहन