मुंबई – शेफाली शहाने तिच्या आगामी “जलसा’चे शूटिंग सुरू केले आहे. सहकलाकार विद्या बालन आणि मानव कौल यांच्याबरोबर तिने शुक्रवारीच हे शूटिंग सुरू केले आहे. विद्या बालन आणि मानव कौल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या “तुम्हारी सुलू’चे डायरेक्शन करणाऱ्या सुरेश त्रिवेणीकडेच या सिनेमाच्या डायरेक्शनचीही जबाबदारी असणार आहे. शेफाली शहाने इंन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील एकामध्ये सिनेमाच स्क्रीप्ट दिसते आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये मुहूर्ताचा क्लॅपबोर्ड दिसतो आहे. “ऍन्ड इट बिगिन्स जलसा बिगिन्स’ असे तिने फोटोंच्या कॅप्शन्समध्ये म्हटले आहे. त्रिवेणी आणि प्रज्वल चंद्रशेखर लिखित, “जलसा’ मध्ये रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बांदी, गुरपाल सिंह आणि सूर्य काशीभटला देखील दिसतील. यापूर्वी शेफाली शहा नेटफ्लिक्सवरच्या “अजीब दास्तान’मध्ये दिसली होती. अगदी अलिकडेच तिने “डॉक्टर जी’चे शूटिंग देखील संपवले आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर आयुष्मान खुराना आणि रकुल प्रित सिंग देखील असणार आहेत. याशिवाय “डार्लिंग’मध्ये आलिया भटबरोबर आणि नेटफ्लिक्सवरील “दिल्ली क्राईम’च्या दुसऱ्या सिझनमध्येही ती दिसणार आहे.