Sheetal Devi : हात नसतानाही शीतल देवीने रचला इतिहास, विश्व चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं सुवर्णपदक!

Sheetal Devi Wins Gold : जम्मू-काश्मीरची 18 वर्षीय भारतीय तिरंदाज शीतल देवीने पॅरावर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. हात नसतानाही आपल्या पाय आणि हनुवटीचा साहाय्याने तिरंदाज करणाऱ्या शीतलने महिलांच्या कंपाउंड वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिने तुर्कियेची विश्व क्रमवारीत अव्वल असलेली ओजनुर क्योर गिरदी हिला 146-143 अशा फरकाने पराभूत करत हा पराक्रम केला. या चॅम्पियनशिपमधील हे तिचे तिसरे पदक आहे.
शीतलने यापूर्वी कंपाउंड मिश्र दुहेरी स्पर्धेत तोमन कुमार याच्यासोबत कांस्यपदक जिंकले होते. या भारतीय जोडीने ग्रेट ब्रिटनच्या जोडी ग्रिनहॅम आणि नाथन मॅकक्वीन यांचा 152-149 असा पराभव केला. तसेच, महिलांच्या कंपाउंड ओपन टीम स्पर्धेत शीतल आणि सरिता यांच्या जोडीला अंतिम सामन्यात तुर्कीविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
वैयक्तिक अंतिम सामन्यात शीतलने अप्रतिम कामगिरी –
History Created in Gwangju! ✨🏹
🇮🇳 India shines at the Gwangju 2025 World Archery Para Championships with its best-ever medal haul – 5 medals (2🥇, 2🥈, 1🥉)! 🏆🔥
🌟 Golden Arrows of Glory:
🥇 Sheetal Devi – Compound Women Open (Champion among 33!)
🥇 Toman Kumar – Compound… pic.twitter.com/glIVpszKyg— SAI Media (@Media_SAI) September 27, 2025
वैयक्तिक अंतिम सामन्यात शीतलने अप्रतिम कामगिरी केली. पहिली फेरी 29-29 अशी बरोबरीत संपली. दुसऱ्या फेरीत शीतलने सलग तीन वेळा 10 गुण मिळवत 30-27 अशी आघाडी घेतली. तिसरी फेरी पुन्हा 29-29 अशी बरोबरीत संपली. चौथ्या फेरीत शीतलकडून किरकोळ चूक झाली आणि तिने 28 गुण मिळवले, तर गिरदीने एका गुणाने ही फेरी जिंकली. तरीही शीतल 116-114 अशी दोन गुणांनी पुढे होती. शेवटच्या फेरीत शीतलने सलग तीन परिपूर्ण 10 गुण मिळवत 30 गुणांसह सुवर्णपदक निश्चित केले. हे तिचे पहिले वैयक्तिक विश्व चॅम्पियनशिप सुवर्णपदक आहे.
हेही वाचा – IND vs SL : रनआऊट असूनही कामिंदू मेंडिसला OUT का दिलं नाही? काय आहे ICC चा नियम? जाणून घ्या
पिलसेन विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती –
उपांत्य फेरीत तिने ग्रेट ब्रिटनच्या जोडी ग्रिनहॅमला 145-140 अशा फरकाने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हा सामना 2023 पिलसेन विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती होती, जिथे गिरदीने शीतलला 140-138 असे हरवले होते. यावेळी शीतलने पराभवाचा वचपा काढत विजय मिळवला. कंपाउंड ओपन टीमच्या अंतिम सामन्यात शीतल आणि सरिता यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी पहिल्या फेरीत तुर्कियेच्या ओजनुर क्योर गिरदी आणि बुर्सा फात्मा उन यांच्या जोडीला 38-37 असे पराभूत केले.
हेही वाचा – IND vs SL : टीम इंडियाने ठोकला विजयाचा षटकार! श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये केले चारीमुंड्या चीत
मात्र, दुसऱ्या फेरीत तुर्कीने पुनरागमन करत स्कोअर 76-76 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या फेरीत भारतीय जोडी दबावाखाली आली आणि केवळ 36 गुण मिळवू शकली, तर तुर्कीने 37 गुणांसह आघाडी घेतली. शेवटच्या फेरीत तुर्कीने जवळपास परिपूर्ण 39/40 गुण मिळवले, तर भारतीय जोडीला 36 गुण मिळाले, ज्यामध्ये एक बाण 7-रिंगवर लागला. यामुळे तुर्कीने चार गुणांच्या फरकाने सुवर्णपदक पटकावले.





