Pune news : राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत महीक्षाला सुवर्णपदक; कोलकाता येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
या स्पर्धेत देशभरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमधील अनेक नामवंत जिम्नॅस्टिकपटूंनी सहभाग घेतला होता.

Pune news : लोणावळा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय सीबीएसई जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या महीक्षा पोलस हिने उल्लेखनीय कामगिरी केली.
१९ वर्षांखालील मुलींच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक प्रकारात तिने फ्लोअर एक्सरसाइजमध्ये सुवर्णपदक, तर व्हॉल्टिंग टेबल प्रकारात रौप्यपदक पटकावले. तसेच सर्वसाधारण गटात उपविजेतेपद मिळविले.
महीक्षा हिने या स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोलकाता येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
या स्पर्धेत देशभरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमधील अनेक नामवंत जिम्नॅस्टिकपटूंनी सहभाग घेतला होता.
महीक्षा ही पुण्यातील महावीर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत आहे. ती गेल्या पाच वर्षांपासून बिबवेवाडी येथील एस. के. जिम्नॅस्टिक अकॅडमीमध्ये सराव करीत आहे. तिच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.





