Shashi Tharoor : माझ्यासाठी राष्ट्र आधी येते, पक्ष नंतर; शशी थरूर यांचे टीकाकारांना उत्तर

कोची : माझ्यासाठी राष्ट्र प्रथम येते आणि पक्ष त्यानंतर. कोणत्याही पक्षाचे उद्दिष्ट एक चांगले भारत निर्माण करणे आहे. जर देश अस्तित्वात नसेल तर काय होईल? देशाच्या सशस्त्र दलांना आणि भारत सरकारला पाठिंबा देण्याची माझी भूमिका कायम राहील. माझा असा विश्वास आहे की, ही गोष्ट देशासाठी योग्य गोष्ट आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे सदस्य आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी केले आहे.
‘शांती, सौहार्द आणि राष्ट्रीय विकास’ या विषयावर येथे आयोजित कार्यक्रमात थरूर बोलत होते. ते येथे ‘विकास, व्यवसायांची भूमिका आणि शांतता आणि सौहार्द’ या विषयावर बोलत होते.णाअणखी एका भाषणात ते सांप्रदायिक सलोखा आणि एकत्र राहण्याच्या प्रयत्न यावर केंद्रित होते. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे दिसून आले.
थरूर म्हणाले की, माझी पहिली निष्ठा कोणावर आहे? माझ्या मते, राष्ट्र प्रथम येते. पक्ष हे राष्ट्राला चांगले बनवण्याचे माध्यम आहेत. म्हणून, माझ्या मते, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरी, पक्षाचे उद्दिष्ट त्यांच्या पद्धतीने एक चांगला भारत निर्माण करणे आहे. आता, पक्षांना ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे, हे प्रत्येक जण ठरवू शकतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारताची भूमिका मांडणा-या सर्वपक्षीय शिष्टमंडळात अनेक राजकीय पक्षांचे सदस्य होते. मात्र, मी देशाच्या बाजूने बोललयाने सर्वाधिक टीका माझ्यावर झाली. मी सशस्त्र दलांना आणि भारत सरकारला पाठिंबा दिला आहे आणि त्यात मी काही चूक केली आहे, असे मला वाटत नाही.
शशी थरूर म्हणाले की, अगदी संयुक्त राष्ट्रांत काम करत असतानाही राष्ट्र प्रथम हे नेहमीच माझे तत्वज्ञान राहिले होते. मी भारतात परतलो ते फक्त राजकारणातून समाजसेवा करण्यसाठी. शिवाय राजकारणाबाहेरही शक्य तितक्या सर्व मार्गांनी देशाची सेवा करण्याची संधी मला मिळते. मी अशा सर्व संधींचा सदुपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस हायकमांडशी काही समस्या आहे का असे विचारले असता, थरूर म्हणाले की, मी येथे कोणत्याही राजकीय मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आलेलो नाही.
प्रमोद तिवारींचा पाठिंबा
शशी थरूर यांच्या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे उपनेते प्रमोद तिवारी म्हणाले की, काँग्रेसची ही नेहमीच भूमिका राहिली आहे… राष्ट्र प्रथम येते आणि पक्ष नंतर येतो. भाजपमध्ये, हे उलट आहे… त्यांच्याकडे पक्ष प्रथम येतो आणि राष्ट्रीय हित शेवटी येते. शशी थरूर जे काही म्हणत आहेत, त्यांना इतिहास आणि परंपरेचे अधिक ज्ञान असू शकते. मी त्याला चुकीचे किंवा बरोबर म्हणत नाही.





