‘जर पक्षाला माझी गरज नसेल तर…’ ; पुन्हा एकदा शशी थरूरांची नाराजी उघड ; हायकमांडला पाठवला ‘हा’ संदेश

Shashi Tharoor । देशभरातील आपल्या अनेक मोठ्या नेत्यांसह सतत कमी होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कारण यावेळी काँग्रेस हायकमांडला केरळमधून वाईट संकेत मिळालेत. पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी केलेल्या विधानावर ते मोठा निर्णय घेणार असल्याचे दिसत आहे.
…तर त्यांच्याकडे कामासाठी इतर अनेक पर्याय Shashi Tharoor ।
तिरुअनंतपुरममधून चार वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले शशी थरूर यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना, “जर काँग्रेसला त्यांची गरज नसेल तर त्यांच्याकडे कामासाठी इतर अनेक पर्याय आहेत. असे म्हटले आहे. शशी थरूर २०२६ मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीबद्दल बोलत होते. त्यांनी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गरजांवर चर्चा केली.
यादरम्यान, ते म्हणाले की, अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की केरळमध्ये नेतृत्व स्वीकारण्यात मी इतरांपेक्षा खूप पुढे आहे. जर काँग्रेस पक्षाला माझा वापर करायचा असेल तर मी पक्षासाठी उपलब्ध असेन. जर त्यांना माझी गरज नसेल, तर मला माझे स्वतःचे काम करायचे आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही असे तुम्ही समजू नका. माझ्याकडे जगभरातून पुस्तके, भाषणे आणि आमंत्रणे आहेत.” असेही त्यांनी त्यावेळी म्हटले.
थरूर यांनी पुढे बोलताना, “सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि केरळ काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळेच त्यांनी संयुक्त राष्ट्रातील आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील आपले आरामदायी जीवन सोडून राजकारणात परतले.”म्हटले.
‘केरळ काँग्रेसला एका नेत्याची गरज ‘ Shashi Tharoor ।
थरूर म्हणाले, ‘ही माझी जबाबदारी नाही, पण मी पक्षाचे लक्ष याकडे वेधले आहे.’ केरळ काँग्रेसमध्ये नेत्यांची कमतरता आहे असे अनेक कार्यकर्त्यांना वाटते. युडीएफमधील काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही मला हे सांगितले आहे.
त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील सातत्यपूर्ण विजयाबद्दल ते म्हणतात, ‘तिरुवनंतपुरममध्ये माझे आकर्षण पक्षापेक्षा खूप मोठे आहे. लोकांना माझे बोलण्याची आणि वागण्याची पद्धत आवडते. जे सामान्यतः काँग्रेसच्या विरोधात आहेत ते देखील मला मतदान करतात. २०२६ च्या निवडणुकीत आपल्याला मतदारांना अशाच प्रकारे आपल्यासोबत ठेवावे लागेल.
हेही वाचा
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता उद्या मिळणार; बिहारमध्ये पार पडणार कार्यक्रम





