शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता उद्या मिळणार; बिहारमध्ये पार पडणार कार्यक्रम

PM Kisan 19th Installment | देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 18 हप्ते मिळाले आहेत. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 व्या हप्त्याचं वितरण सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी केलं जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या वितरणाचा कार्यक्रम बिहारमध्ये पार पडणार आहे.
बिहारमधील भागलपूर या ठिकाणी सोमवारी (दि. 24) दुपारी 2:00 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचं वितरण मोदी यांच्या हस्ते होईल. राज्यातील 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1 हजार 967 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आलेली आहे.
तर देशभरातील ९.८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २२,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा थेट हस्तांतरण केले जाणार आहे. बिहारमध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नागपूर येथून सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केंद्र सरकारच्या https://pmindiaweb-cast.nic.in या लिंकवरून पाहता येणार आहे. PM Kisan 19th Installment |
पीएम-किसान योजनेंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा केले जातात. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. PM Kisan 19th Installment |
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ ठराविक शेतकऱ्यांनाच मिळतो. जे सरकारी नोकरीत आहेत, अथवा कर भरतात ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच, कुटुंबातील केवळ एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
हेही वाचा:
“केंद्र सरकारने १० हजार कोटी ऑफर केले तरीही…”; तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचा इशारा





