शोले चित्रपटाच्या जुन्या तिकिटाचा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन म्हणाले – “हे जपून ठेवलं आहे”!

sholey movie – बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर सतत ऍक्टिव्ह असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो शेअर केला आहे, जो त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण आठवण करून देतो.
अमिताभ बच्चन यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाचं मूळ तिकीट शेअर केलं आहे. या तिकिटावर स्पष्टपणे लिहिलं आहे कि, हे तिकीट १५ ऑगस्ट १९७५च असून, मुंबईतील मिनर्व्हा थिएटरमधील आहे. यावर शोची वेळ,तिकीट क्रमांक आणि 20 रुपये किंमत देखील दिसत आहे.

बिग बी यांनी या फोटोसोबत लिहिलं आहे, “शोले चित्रपटाचं मूळ तिकीट …. जपून ठेवलं आहे … “
त्यांच्या या पोस्टवर चाहते प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत आणि या ऐतिहासिक आठवणीबद्दल कौतुक करत आहेत.
शोले हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासातील एक अजरामर चित्रपट मानला जातो. या चित्रपटात अमिताभ बच्चन,धर्मेंद्र,संजीव कुमार,हेमा मालिनी,जया भादुरी आणि अमजद खान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. गब्बरसिंह या खलनायकाच्या व्यक्तिरेखेमुळे हा चित्रपट आणखी गाजला होता.
आजही हा चित्रपट आणि त्यातील संवाद प्रेक्षकांच्या मनात कोरलेले आहेत. अमिताभ बच्चन यांचं हे तिकीट शेअर करणं म्हणजे जणू चाहत्यांसाठी एक अमूल्य आठवणच ठरली आहे.





