मुख्यमंत्री स्टालिन यांच्या सरकारवर हल्लाबोल –
\n
\nसोमवारी (३० मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समर्थकांना संबोधित करताना विजय यांनी सत्ताधारी DMK सरकारवर जोरदार टीका केली. तामिळनाडूतील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “ही तामिळनाडूला वाचवण्याची लढाई आहे,” असे म्हणत त्यांनी भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अपयशावरून मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना लक्ष्य केले.
अभिनयाकडून राजकारणाकडे –
\n
\nफेब्रुवारी २०२४ मध्ये राजकारणात येण्याचा निर्णय घेणाऱ्या विजय यांनी ‘द गोट’ हा आपला शेवटचा चित्रपट असेल असे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी एच. विनोद यांचा ‘जन नायकन’ हा चित्रपट साइन केला आहे, ज्याला अद्याप सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात विजय यांचा हा ‘सर्वसामान्यांना संधी’ देण्याचा पॅटर्न किती यशस्वी ठरतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.