‘ए… बंद करो’; अमिताभ बच्चन पापाराझींवर संतापले

Amitabh Bachchan । बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळख असलेले अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. अभिनयासह ते आपल्या शांत स्वभावासाठी देखील चर्चेत आहेत. मात्र सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ते पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि खांद्यावर शाल घेतलेले दिसतात. ते बंगल्याबाहेर येताच कॅमेरा त्यांच्याकडे वळतात. ते पाहून अमिताभ बच्चन संतापल्याचे दिसतात.
यावेळी ते पापाराझीना “ए व्हिडिओ मत निकालो, बंद करो” असं म्हणताना दिसतात. त्यांचा हा राग पाहून सर्वच चकीत झाले आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Amitabh Bachchan |
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांना नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘कल्कि 2898 ए.डी’ या चित्रपटात काम केले होते. त्यांनी या चित्रपटात ‘अश्वत्थामा’ ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. महाभारतावर आधारित या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हासन यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल येणार असून यात अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. Amitabh Bachchan |
हेही वाचा:
शशी थरूर यांच्या समोर मोठा पेच ? ; हायकमांडनंतर आता केरळ युनिटकडून ‘अहंकार’





