Shardul Thakur : शार्दुल ठाकूरचं धमाकेदार शतक, इंग्लंड दौऱ्यापूर्वी ठोकला कसोटी संघात दावा

Shardul Thakur’s unbeaten 122 against England Lions : इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाच्या तयारीसाठी खेळल्या गेलेल्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर चमकला. त्याने आपला जबरदस्त फॉर्म दाखवत आगामी मालिकेपूर्वी इंग्लंडच्या संघाला इशारा दिला आहे. बेकनहॅम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी साकारत भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी मजबूत दावा ठोकला आहे.
शार्दुल ठाकूरने झळकावलं शतक –
शार्दुलने यापूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये २७, १९ आणि ३४ धावांचे योगदान दिले होते, तसेच चार विकेट्स घेतल्या होत्या. या शतकाने त्याच्या अष्टपैलू क्षमतांना पुन्हा अधोरेखित केले. इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी हा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा होता. शार्दुल, जो गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय संघाबाहेर होता, त्याने या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपली छाप सोडली.
शार्दुल ठाकूरने अष्टपैलू कामगिरीने वेधलं लक्ष्य –
🚨 THE SHARDUL THAKUR SHOW 🚨
– Shardul Thakur scored a brilliant Hundred in Intra Squad Game, He smashed 122 runs. (Devendra Pandey). pic.twitter.com/ym1Z6peD7n
— Tanuj (@ImTanujSingh) June 15, 2025
रणजी स्पर्धेतही केली होती चमकदार कामगिरी –
शार्दुल ठाकूरने आपल्या आक्रमक फलंदाजीने इंग्लंड लायन्सच्या गोलंदाजांना हैराण केले, विशेषत: त्याच्या जलद धावसंख्येने गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. याशिवाय, त्याने गोलंदाजीतही विकेट्स घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याचा हा पराक्रम त्याच्या रणजी करंडकातील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर आला, जिथे त्याने ३९६ धावा आणि ३० गडी घेतले होते. यामध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध शतक (११९) आणि मेघालयविरुद्धच्या शानदार गोलंदाजीचा समावेश आहे.
हेही वाचा – Anushka Sharma : अनुष्काने २९ व्या वर्षी विराटशी का केलं होतं लग्न? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा
शार्दुल ठाकूरची आतापर्यंतची कामगिरी –
३३ वर्षीय शार्दुल ठाकूरने आतापर्यंत १८ डावांमध्ये चार अर्धशतकांसह एकूण ३३१ धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी इंग्लंडमध्ये चार कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १७३ धावा केल्या आहेत आणि १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने इंग्लंडच्या भूमीवर त्याचा शेवटचा कसोटी सामना ७ ते ११ जून २०२३ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे खेळला होता, जिथे त्याने पहिल्या डावात ५१ धावांचे महत्त्वाचे अर्धशतक झळकावले होते.
हेही वाचा – WMPL 2025 : पुणे वॉरियर्सचा थरारक विजय! सोलापूरवर १ धावेने मात करत पटकावलं पहिलं विजेतेपद
शार्दुलची नितीशसोबत स्पर्धा –
या कामगिरीमुळे शार्दुल ठाकूर कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडूसाठी नितीश कुमार रेड्डीशी स्पर्धा करत आहे. आजच्या शतकामुळे शार्दुलने भारतीय संघ व्यवस्थापनाला आपली निवड योग्य असल्याचे संकेत दिले. २० जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो संघातील गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीला मजबुती देऊ शकतो.





