WMPL 2025 : पुणे वॉरियर्सचा थरारक विजय! सोलापूरवर १ धावेने मात करत पटकावलं पहिलं विजेतेपद

पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १८ षटकांचा सामना पार पडला –
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सुरुवातीला पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्यात आला. सोलापूर स्मॅशर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर ख़ुशी मुल्ला १७ धावा काढून तंबूत परतली. त्यात तिने ३चौकार मारले. सोलापूरच्या शरयू कुलकर्णीने खुशीला झेल बाद केले व संघाला पहिला धक्का दिला. सुहानी कहांडळने २० धावा काढून बाद झाली.
अभिनंदन पुणे वॉरियर्स!!!#WMPL 2025चं विजेतेपद पटकावून चषकावर आपलं नाव कोरल्याबद्दल पुणे वॉरियर्स संघाचं मनःपूर्वक अभिनंदन!
✌️🎉🎊🏆उपविजेत्या सोलापूर स्मॅशर्सच्या संघाने अंतिम सामन्यात चांगली लढत दिली. त्यांनाही पुढील यशासाठी शुभेच्छा!@MahaCricket @wmpltournament… pic.twitter.com/QEmeJDq80R
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 15, 2025
त्यानंतर अक्षया जाधवने २३चेंडूत १चौकार व २षटकारासह २९धावा काढून संघाची धावगती वाढवली. कर्णधार अनुजा पाटीलने २१चेंडूत नाबाद ३० धावांची संयमी खेळी केली. तिने २चौकार व १षटकार खेचले. अनुजाने श्वेता मानेच्या समवेत चौथ्या विकेटसाठी ३८चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाला १८षटकात ६ बाद १२९ अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. सोलापूर स्मॅशर्सकडून स्वांजली मुळे(२-६), आचल अगरवाल(२-२६) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
सोलापूरची सुरुवात खराब झाली –
१२९धावांचे आव्हान सोलापूर स्मॅशर्स संघाला १८ षटकात ६बाद १२८धावाच करता आल्या. सोलापूरची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ईश्वरी अवसरे(८)धावांवर तंबूत परतली. तिला पुणे वॉरियर्सच्या अनुजा पाटीलने झेल बाद केले. त्यानंतर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधार तेजल हसबनीसने आक्रमक सुरुवात केली. तिने २चौकार व १षटकार ठोकले. पण पुणे वॉरियर्सच्या इशिता खळेने तिला पायचीत केले व सोलापूर स्मॅशर्सला मोठा धक्का दिला. ईश्वरी सावकारने २०चेंडूत १चौकारासह २२धावांची खेळी करून धावफलक हलता ठेवला. ईश्वरी सावकारला चोरटी धाव घेत असताना धावबाद झाली.
हेही वाचा – Pataudi Trophy: ‘अँडरसन-तेंडुलकर’ की ‘पतौडी’? सचिनच्या विनंतीने जपला इतिहास, चाहत्यांकडून कौतुक
विजयासाठी ६ चेंडूत होती ९ धावांची आवश्यकता –
मुक्ता मगरेने एकाबाजूने संघाची धुरा सांभाळताना चेंडूत चौकारासह ४० धावांची खेळी केली. मुक्ता मगरेला इशिता खळेने झेल बाद करून सामन्यातील रोमांच वाढवला. शाल्मली क्षत्रियने धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सोलापूर स्मॅशर्स संघाला विजयासाठी ६ चेंडूत ९ धावांची आवश्यकता होती. हे षटक कर्णधार अनुजा पाटीलने घेतले. पहिल्या चेंडूवर दामिनी बनकरने एक धाव घेतली. त्यानंतर शाल्मलीने चौकार मारत विजयाचे लक्ष्य आणखी कमी केली. पण चौथ्या चेंडूवर शाल्मलीला तिने अनुजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेतला व सामन्यात रंगत आणली. १चेंडूत २ धावांची गरज असताना स्वांजली मुळेने अनुजाच्या हातात चेंडू मारला व अनुजाने मिळालेल्या संधीचे सोने करत तिला धावबाद केले व विजयावर शिक्कामोर्तब केले.





