Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शरद पवारांचा विश्वासू नेता अमित शाहांच्या भेटीला, चर्चांना उधाण
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या विविध राजकीय भेटींमुळे चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या विविध राजकीय भेटींमुळे चर्चांना उधाण आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसह विविध स्थानिक प्रश्नांबाबत निवेदन सादर केल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणे यांनी अमित शाह यांना बीड जिल्हा कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत सविस्तर पत्र दिले. या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तुरुंगात काही कैद्यांना मोबाईल, प्रतिबंधित वस्तू आणि विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचे आरोप पत्रात नमूद करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
या प्रकरणाचा महाराष्ट्र सरकारने सविस्तर अहवाल मागवून दोषींवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही सोनवणे यांनी पत्राद्वारे केली आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्या भेटीवेळी बजरंग सोनवणेही उपस्थित होते. तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. या सलग राजकीय भेटींमुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
NCP Sharad Pawar : रोहित पवारांचा संकेत खरा ठरला! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल






