Nagar | शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणी सुरु

नगर, (प्रतिनिधी) – अगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्ह्यात मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी गाव तेथे शाखा सुरु करण्याचा धडाका लावला आहे.
त्यामुळे येणार्या काळात नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच जनसंपर्क वाढविण्यासाठी गाव तेथे शाखा करण्यात आल्या आहेत.
नगर तालुक्यातील शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जेनी, ससेवाडी, बहिरवाडी, जेऊर, इमामपूर, खोसपुरी, पांगरमल, उदरमल, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, धनरगरवाडी, चापेवाडी, इत्यादी गावात आज शाखा सुरु करण्यात आली.
यावेळी डोंगरगण गावचे उपसरपंच संतोष पटारे, नीलेश कराळे, किशोर शिकारे, बाबाजी आवारे, तुषार नवाळे, आकाश निमसे, सागर गुंड, सागर मगर, अनिल वारुळे, अविनाश जावळे, दत्ता रोकडे, गणेश पालवे, महेश कराळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाचे नेते शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, तसेच खासदार नीलेश लंके, नगर राहुरी- पाथर्डी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शना खाली गाव तेथे शाखा सुरु करण्यात येत आहे.
पक्षाची धेय्य धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या अडअडचणी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी सांगितले.





