Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांंच्या शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य म्हणाले..
Sharad Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यावर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधानानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न विचारला जात होता. अखेर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज सायंकाळी पाच वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या दृष्टीने मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही.
आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याची पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. यामुळे सुनेत्रा पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती शरद पवार यांना न देताच त्या मुंबईत दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रीकरणाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. जिल्हा परिषद निवडणुकानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सांगितले जात होते. अखेर आज शरद पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पण आता खंड पडला असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, पटेल, तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. NCP ने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
पार्थ पवार राज्यसभेवर?
पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची हाचलाची देखील सुरू झाल्या आहेत. यासाठी भाजपसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री उशीरा मुलगा जय पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या.






