आज ‘शरद पवार’ ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होणार; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती…

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईतील ब्रीच काँडी हॉस्पिटलमध्ये भरती होणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. उद्या शरद पवार यांच्यावर एक डोळ्याची शस्त्रक्रिया होणार आहे. आणि त्यापूर्वीच म्हणजेच आज ते रुग्णालयात दाखल होणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांची आधीची शस्त्रक्रिया देखील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली होती.
अजित पवार म्हणाले, ‘शरद पवार यांच्या डोळ्याचे ऑपरेशन उद्या मंगळवारी होणार आहे. आज शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. मध्यंतरी दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तब्येत खालावल्यामुळे तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच, ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार हे काही दिवस रुग्णालयातच आराम करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.





