Baramati News : शरद पवार किंग मेकर, सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र फिक्स आमदार! बारामतीतील बॅनरची सर्वत्र चर्चा

Baramati News : ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त फुल अँड फायनल ग्रुपकडून बारामतीच्या गुणवडी चौकात बॅनर लागले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे वेगवेगळे बॅनर लागले आहेत. शरद पवारांच्या बॅनरवर ‘देशाचे किंगमेकर’ असा उल्लेख आहे.
तर सुप्रिया सुळेंच्या फोटोखाली भावी मुख्यमंत्री, युगेंद्र पवारांच्या फोटोखाली फिक्स आमदार असा उल्लेख आहे. बॅनरवरील हा उल्लेख लक्षवेधी ठरत आहे. गुणवडी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांचेही बॅनर लावण्यात आले आहेत.
पण सर्वाधिक चर्चा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या बॅनरची सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका गणेशोत्सव मंडळानं अजित पवारांचा फोटो असलेला बॅनर लावत त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता.
आता बारामतीत सुप्रिया सुळेंच्या फोटोखाली भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सुळेंच्या रुपात राज्याला पहिली मुख्यमंत्री मिळणार का, लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीनं महिला मुख्यमंत्र्याचा विषय चर्चेत आणला आहे का, असे प्रश्न मतदारांना पडू लागले.





