Sharad Pawar: ‘शेतकरी संकटात, सरकारने ताकद द्यावी!’ पुरंदरच्या ओसाड रानातून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
Sharad Pawar: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून पुरंदर तालुक्यातील परिंचे, मांडकी आणि लपतळवाडी परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी.

Sharad Pawar- केंद्र सरकार व राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाण्याचे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. पुरंदर मधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी महायुतीला दुष्काळ निवारणाबाबत उपाययोजना करण्याबाबत गांभीर्याने घ्यावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. परिंचे (ता. पुरंदर) येथे येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात आज दुष्काळ स्थिती आहे.
शेतकरी संकटात आहे. पाऊस पडला नाही तर माणसं कशी जगवायची हा प्रश्न लोकांच्या समोर आहे. मी राज्य सरकार सोबत बोलत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्याला संकटाला सामोरे जाण्याची ताकद द्यावी, हे साकडं मुख्यमंत्री यांच्या कानावर घातला आहे. पवार म्हणाले की, (दि.२७) सप्टेंबर रोजी मी एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार काही तालुके दुष्काळ जाहीर केले नाहीत. ते करावेत. दुष्काळी परिस्थितीत काही गोष्टी सरकारने करायची आवश्यकता आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी तहसीलदारांना टँकर सुरू करण्याचे अधिकारी द्यावेत. शेतकऱ्याची कृषी पंपाची वीज खंडित करू नये, आदी मागण्या मांडल्या आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची भावना काय याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे,
यावेळी शरद पवार यांनी लपतळवाडी येथील तलावाची पाहणी करून मांडकी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. हेमंतकुमार माहूरकर यांनी प्रास्ताविक केले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी स्वागत केले. युवा नेते युगेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी काळदरी, मांढर, परिंचे, पांगारे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या
काळदरी परिसरात पावसाने ताण दिल्याने भात शेती धोक्यात आली आहे. परिंचे परिसराचे पिलाणवाडी जलाशयाचे पाणी मिळत नाही, पिके धोक्यात आहेत. पिकांचे सरसकट पंचनामे व्हावेत, पीक विम्याची नुकसानभरपाई मिळावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, भोंगवली, माहूर, परिंचे परिसरातून जाणाऱ्या हायटेन्शन टॉवरचे काम बंद करावे, आदी अनेक शेतीविषयक प्रश्न व व्यथा शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या






