jay pawar | rutuja patil – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जय पवारांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘ऋतुजा’ असे जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. साखरपुड्यापूर्वी गुरुवारी जय आणि ऋतुजा यांनी आजोबा शरद पवार यांची पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली. जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते राजकारणापासून काहीसे बाजूला आहेत. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी लोकसभा लढवली तसेच पाठोपाठ राज्यसभेवर त्यांची निवड झाल्याने बारामतीमधील जनतेचे प्रश्न जाणून घेण्याकरिता जय पवार यांनी पण राजकारणात पाऊल ठेवले आहे. कोण आहेत ‘ऋतुजा पाटील’? खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाचा जय पवार यांचं लग्न सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे फलटणचे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत होणार आहे. तर, जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सचे पाटील यांच्या घराच्या सुनबाई आहे. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. व्यवसाय ते राजकारण, जय पवार यांचा प्रवास…. पार्थ पवार हे अजित पवार यांचे थोरले चिरंजीव तर जय पवार हे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार यांचा उद्योग व्यवसायाकडे जास्त कल आहे. दुबईत काही वर्षे त्यांनी व्यवसाय केला आहे. सध्या मुंबई, बारामती येथे ते व्यवसाय पाहत असल्याचे सांगितले जाते. परंतु घरातच राजकारण असल्याने तसेच आई-वडील दोघेही लोकप्रतिनिधी असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची -सोडवणूक करण्याकरिता ते ही राजकारणातही सध्या सक्रिय होत असल्याचे दिसते. ही बातमी नक्की वाचा…. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या धाकट्या चिरंजीवाचं ठरलं; सुप्रिया सुळेंनी शेअर केले ‘जोडीचे’ फोटो