शरद पवारांनी मुंबईत बोलावली महत्वाची बैठक; सुप्रिया सूळे बैठकीचं करणार मार्गदर्शन

मुंबई – राज्यात रोज नवीनवीन राजकीय घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पडल्याने राज्यातील राजकरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी पक्ष नव्याने उभा करण्यासाठी कंबर कसली असून, राज्यभर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे अजित पवार गट देखील सभा घेत जशास तसे उत्तर देण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे.
दरम्यान, अश्यातच आता राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे. 9 सप्टेंबरला ही बैठक होणार असून यामध्ये सगळे विद्यमान आमदार, खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे. राज्यातील पक्षाचे माजी आमदार, माजी खासदार, जिल्ह्यांचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना देखील बैठकीचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तसेच, जयंत पाटील आणि सुप्रिया सूळे बैठकीचं मार्गदर्शन करणार आहेत.





