शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

सोलापूर : सध्या राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सगळीकडे प्रचाराला सुरुवात झाली आहे. अनेक राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या बाबतीत एक खळबळजनक दावा केला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे. दाऊदचा शोध घेताना तिसऱ्या दिवशी दिल्लीत ब्लास्ट झाला. इसिसला माणसं पुरवण्याचे काम जगभरातून झाले. 1990 ते 2000 देशात ब्लास्ट होतं गेले. त्यामुळे शरद पवार आणि दाऊद यांच्याशी भेटीचा काही संबंध आहे का हे तपासले पाहिजे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
त्यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात काय परिणाम होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





