काका-पुतण्यात बंद दाराआड चर्चा ; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ? वाचा सविस्तर

Sharad Pawar – Ajit Pawar Meet। शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही गटांनी मुंबईत आपली ताकद दाखवण्यासाठी वेगवेगळे मेळावे आयोजित केले होते. आपणच बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचा दावा या मेळाव्यातून दोन्ही गटांनी केला. तर दुसरीकडे पुण्यात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे अध्यक्ष एकाच मंचावर उपस्थित होते. त्यांच्या याच भेटीवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही नेत्यांच्या गुप्त बैठकीबाबत सगळीकडे चर्चा Sharad Pawar – Ajit Pawar Meet।
वसंतदादा शुगर इन्सटिट्यूडच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधरण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने एकाच मंचावर ते दोघे आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांची बंद दाराआड झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बीएमसी निवडणुका जवळ आल्या आहेत आणि अजित पवारांच्या आईनेही अलीकडेच दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाल्याचा दावा शिवसेना (शिंदे) नेत्यांनी केला होता. या सर्व परिस्थितीत दोन्ही नेत्यांच्या या गुप्त बैठकीबाबत सगळीकडे चर्चा सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
ही बैठक केवळ साखर उद्योगाशी संबंधित Sharad Pawar – Ajit Pawar Meet।
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड झालेल्या बैठकीबद्दल माहिती दिली आहे. ही बैठक केवळ साखर उद्योगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झाली आहे. साखर उद्योगाशी जवळून संबंधित असलेल्या कृषी, उत्पादन शुल्क, सहकार आणि ऊर्जा विभागांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत उपस्थित होते. त्याच वेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) आमदार रोहित पवार म्हणाले,”दोन्ही पक्षाचे प्रमुख चर्चेसाठी एकत्र येत आहेत, त्यांचे स्वागत करायला हवे.” असे म्हटले.
महाराष्ट्र भाजप अध्यक्ष आणि राज्य सरकारचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चेचे स्वरूप राजकीय होते की नाही हे आम्हाला माहित नाही. जर ही राजकीय चर्चा असती तर अजितदादांनी महायुतीमध्येही याबद्दल बोलायला हवे होते,” असे त्यांनी म्हटले. तसेच “जर ही वैयक्तिक भेट असेल तर ती पूर्णपणे कौटुंबिक बाब आहे.” असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, व्हीएसआयच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना, शरद पवार यांनी अजित पवारांच्या सूचनेनुसार दोन पुरस्कारांतर्गत बक्षीस रक्कम १० हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्याची घोषणा केली. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर काका-पुतणे दोघेही एकत्र सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती.
हेही वाचा
“उद्धव ठाकरेंची टोकाची भूमिका…” ; ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया





