Sharad Pawar : शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर! ‘गाव विकणे आहे’ म्हणणाऱ्या तुळशी गावाला भेट; ५० लाखांची मदत
Sharad Pawar : पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार थेट बांधावर पोहोचले आहेत.

Sharad Pawar : पाण्यासाठी हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी तुळशी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. (Sharad Pawar)
काही दिवसांपूर्वी ‘तुळशी गाव विकणे आहे’ असे बॅनर लावून राज्याचे लक्ष वेधणाऱ्या या गावासाठी शरद पवारांनी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, दुष्काळाची परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Sharad Pawar)
शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातून आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. माढा हा त्यांचा लोकसभा निवडणुकीतील मतदारसंघ असल्याने या भागातील दुष्काळी परिस्थितीची त्यांनी पाहणी केली. तुळशी गावातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गावकऱ्यांची व्यथा त्यांनी जाणून घेतली. (Sharad Pawar)
‘१९७२ च्या दुष्काळाची आठवण आजही आहे’
यावेळी शरद पवार यांनी १९७२ मधील दुष्काळाची आठवण सांगितली. “१९७२ साली असाच दुष्काळ पडला होता. त्यावेळी मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. सरकारकडून शेतकऱ्यांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला होता,” असे त्यांनी सांगितले. (Sharad Pawar)
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी ५० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीसोबतच सरकारकडेही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar)
दुष्काळाचा मुद्दा पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती येथे येतील, तेव्हा खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मराठवाड्याचा दुष्काळी दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar)
दुष्काळी परिस्थितीवर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना लेखी सूचना दिल्याचे पवार यांनी नमूद केले. (Sharad Pawar)
‘तुळशी गाव विकणे आहे’ बॅनरमुळे राज्यभर चर्चा
माढा तालुक्यातील तुळशी गावातील भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी ‘तुळशी गाव विकणे आहे’ असे बॅनर लावले होते. या बॅनरमुळे गाव राज्यभर चर्चेत आले होते. (Sharad Pawar)
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी बॅनर हटवला होता. आता शरद पवार यांनी स्वतः गावाला भेट देत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. त्यांच्या या भेटीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. (Sharad Pawar)





