शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरीरातील थकवा दूर करण्यासाठी त्यांना सलाईन लावण्यात येणार आहे. मागील आठवड्यातही शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे याच रुग्णालयात उपचार घेत होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली होती. मात्र त्यांना पुन्हा थकवा जाणवू लागला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांशिवायच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्याची कमतरता जाणवणार आहे. संख्याबळाचे कारण देत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीला मान्यता दिलेली नसून नजीकच्या काळातही याबाबत निर्णय होण्याची शक्यता नाही. १५ व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन डिसेंबर २०२४ मध्ये पार पडले. सर्वसाधारणपणे पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड होते. मात्र, संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित आहे. अजितदादांच्या घातपाताचा संशय अन् थेट गावबंदची हाक अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेकांकडून संशय व्यक्त केले जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी काही पुराव्यांआधारे हा वैमानिकाकडून करवून घेतलेला घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी तपास यंत्रणांच्या संथ कारभारावर तसेच VSR कंपनीशी अनेक बड्या नेत्यांचे लागेबंध असल्याबाबत मोठे आरोप केले आहेत. यानंतर आता बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावाने अजित पवार यांचा अपघात नसून घातपातच झाल्याचा संशय असून शासनाने लवकरात लवकर तपास करावा, म्हणत आज गावबंदची हाक दिली आहे. तसेच अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी गावकरी निवदेन देणार आहेत. Ajit pawar Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; रुग्णालयात केलं दाखल, सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती रमजान महिन्यानिमित्त अबू आझमींची फडणवीसांकडे मोठी मागणी सध्या रमजान सुरू असून मुस्लिम समाजासाठी हा महिना खूप महत्त्वाचा असतो. या महिन्यात महाराष्ट्र सरकारने काही विशेष सवलती द्यावात, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे रमजान महिन्यात धार्मिक सवलती देण्याची विनंती केली आहे. रोजा आणि नमाज पठण करणाऱ्यांना दुपारी 4 वाजेपर्यंतच कार्यालयात काम करण्याची आणि त्यानंतर सुट्टी घेण्याची परवानगी द्यावी”, असं ते म्हणाले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये धार्मिक सवलतीअंतर्गत सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात दुपारी 4 वाजल्यानंतर सुट्टी देण्यात आली आहे. फडणवीसांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्रातही असा निर्णय घ्यावा, जेणेकरून रोजा करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल.” नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘डिजीयात्रा’ची सुरुवात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी डिजीयात्रा उपक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिजिटल पद्धतीने अधिकृत सहभाग नोंदवला आहे. विमानतळाच्या टर्मिनलमध्ये मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात तीन प्रवाशांनी डिजीयात्रा ई-गेटचा वापर करत बायोमेट्रिक प्रवेशद्वाराचे रिबन कापले. दरम्यान, डिजीयात्रा प्रणालीमध्ये चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. यामुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ होते. ही संपूर्ण प्रक्रिया कॉन्टॅक्टलेस व पेपरलेस असल्याने प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. देशातील आणखी पाच विमानतळांवर हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण, आरोपी कराड समर्थक? बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले. मात्र अद्याप त्यांचे आरोपी सापडले नाहीत. असे असतानाच आता महादेव मुंडे यांचा मुलगा ट्युशन वरून घराकडे येत असताना सोमेश्वर नगर भागामध्ये त्याला मारहाण करण्यात आली. एका व्यक्तीने मुलाला अडवून ‘तू कोणाचा आहे’ असे विचारले आणि त्याने ‘मी महादेव मुंडे यांचा मुलगा आहे’ असे सांगताच त्याला मारहाण केली. दरम्यान, मारहाण करणारा बालाजी आघाव वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचे समोर आले आले. याप्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नीने माझ्या मुलांना कराडच्या मुलांपासून धोका असून पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. मात्र ही मारहाण का करण्यात आली, याची चौकशी आता परळी पोलीस करत आहेत. Budget Session 2026 : उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न, ‘हे’ मुद्दे गाजणार दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला दिल्लीमध्ये एक मोठा दहशतवादी कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी भीषण हल्ल्याचा कट रचणाऱ्या ८ संशयितांना अटक केली आहे. हे आरोपी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘ISI’ आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटनांच्या इशाऱ्यावर काम करत होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राबवलेल्या एका मोहिमेतंर्गत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून या ८ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून ८ मोबाईल फोन आणि १६ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. हे आरोपी बनावट आधार कार्ड वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानमधील अलीकडील आत्मघाती हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला. या एअर स्ट्राईकमध्ये १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावरील रिपोर्ट्सनुसार, हे हल्ले अफगाणिस्तानच्या हद्दीत झाले आहेत. या हल्ल्यानंतर अफगाण सरकारचे विधानही समोर आलं आहे. अफगाणिस्तान सरकारने म्हटलं आहे की, पाकिस्तानने एका मदरसावर हल्ला केला असून या हल्ल्यात १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानने या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं म्हटलं आहे. Suryakumar Yadav भारत आणि दक्षिण आफ्रिका सुपर-8 मध्ये देणार टक्कर टी20 विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर 8 सामना आज 22 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांनी अद्याप विश्वचषकात पराभव पत्करलेला नाही. टीम इंडिया ग्रुप अ मधून अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका ग्रुप ड मध्ये प्रथम स्थानावर आहे. हे दोन्ही संघ 2024 च्या टी20 विश्वचषक फायनलमध्येही आमनेसामने आले होते, जिथे भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. आता सुपर 8 मध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. Pimpri Chinchwad News : साधं काम अन् मोठा घोळ! पिंपरीगावातील ‘या’ रस्त्यावर रात्री प्रवास करताय? मग हे वाचाच रजनीकांत आणि कमल हासन ४७ वर्षांनंतर एकत्र दोन दक्षिण भारतीय सुपरस्टार ४७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार आहेत. रजनीकांत आणि कमल हासन हे नेल्सनच्या ‘केएच एक्स आरके’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी २१ फेब्रुवारी २०२६ रोजीचा पहिला प्रोमो रिलीज केला. कमल हासन आणि रजनीकांत यांनी शेवटचा चित्रपट १९७९ मध्ये आलेल्या “अल्लाउद्दीनम अल्भुथा विलाक्कम” मध्ये स्क्रीन शेअर केला होता, ज्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. चाहत्यांना आशा होती की या चित्रपटानंतर ही सुपरस्टार जोडी लवकरच एकत्र दिसणार आहेत. हेही वाचा: Ajit Pawar : बारामती तालुक्यातील ‘या’ गावाने दिली बंदची हाक; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत केली मोठी मागणी