Pune District : 300 भाविकांना शनिशिंगणापूर दर्शन

आळंदी : शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांचा वाढदिवस रविवारी (दि. 15) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 300 भाविकांना शनिशिंगणापूर दर्शन, आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात 250 भाविकांना तुळशी रोपांचे वाटप, निजानंद महाराज वेदपाठ शाळेत 150 विद्यार्थ्यांना अन्नदान, नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेतील 100, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील 100 विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. तसेच माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर यांच्याकडून अन्नपूर्णा आश्रमात अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले. यावेळी, राहुल चव्हाण यांच्यावर आळंदी शहरातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीतील नागरिकांसाठी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 14) रात्री साडेदहा वाजता आळंदीतील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात भैरवनाथाला नारळ वाढवून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी डी. डी. भोसले, माजी नगरसेवक प्रकाश कुर्हाडे, भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे, भजनी मंडळाचे पंडितराव रानवडे व त्यांचे सहकारी यांसह उपस्थित नागरिकांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या. 300 भाविकांना घेऊन बस शनिशिगणापूरला निघाली. रात्री अडीच वाजता शिंगणापूर येथे पोहोचल्यानंतर विश्रांती घेऊन पहाटे चार वाजता स्नान आटोपून शनि देवाचे दर्शन घेण्यात आले. यावेळी देवस्थानकडून राहुल चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. चव्हाण यांनीही तेथील कर्मचार्यांचा सन्मान केला.
या यात्रेला शिवसेना जिल्हा प्रमुख भगवानशेठ पोखरकर, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, माऊली संस्थानचे व्यपस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी शुभेच्छा दिल्या. या यात्रेत माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, विकास वाघमारे, शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे, बापू येळवंडे, शिवसेना कार्यकर्ते योगेश पगडे, अण्णासाहेब घेणंद, विभागप्रमुख राहुल थोरवे, डॉ. विकास थोरवे, शिवसेना शाखा-2 प्रमुख नितीन ननवरे, विनायक महामुनी, एचडीएफसी बँक व्यवस्थापक शशिकांत बाबर, साईनाथ ताम्हाने, परसराम धनवटे, हनुमंत चव्हाण, सचिन तळेकर, संदीप तळेकर,
गणेश तळेकर, माऊली महाराज पडघम, ज्ञानेश्वर गारकर, सहदेव मंडले, प्रदीप कुरे, किरण कोल्हे, उदय काळे, मोरे काका, मारूती ढगे, मनोज कुर्हाडे, किशोर देशपांडे, मयुर पेठकर, सुनिता जाधव, संगिता राहुल चव्हाण, शैला डिसले, भाग्यश्री गावडे, अनुराधा जाधव, अर्जना इंगळे, राजश्री लकडे, वर्षा महामुनी, मंगल भांबरे, काजल पोखरकर, मनिषा थोरवे, सोनल मोहिते, मंगल भुतेकर, सुप्रिया जाधव, पल्लवी माने, अल्का असादे यांसह 300 पेक्षा अधिक महिला, पुरुष सहभागी झाले होते. शनिदेवाचे दर्शन घडल्याने नागरिकांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला.
माऊली मंदिरात 250 भाविकांना तुळशी रोपांचे वाटप
शनिशिंगणापूर येथील कार्यक्रम आटोपून आळंदी पोहोचल्यानंतर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींचे समाधी दर्शन घेऊन दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या भाविकांना 250 तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. तर वाढदिवसानिमित्त माऊली संस्थान कमिटीतील कर्मचार्यांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
निजानंद महाराज वेदपाठ शाळेत वैदिक पद्धतीने वाढदिवस
सायंकाळी स्वामी गोविंददेव गिरी यांच्या निजानंद महाराज वेदपाठ शाळेत वैदिक पद्धतीने मंत्रोच्चारात राहुल चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंत्रोच्चाराने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. वाढदिवसाच्या या सोहळ्यात शहरभर आनंदाचे वातावरण होते. शिवसेनेच्या या उपक्रमामुळे आळंदीतील नागरिकांना एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.
मी आज जे काही आहे ते आपल्या सर्वांच्या प्रेम आणि समर्थनामुळेच आहे. वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देणार्या सर्व नागरिक, मित्र, कुटुंबीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.
– राहुल चव्हाण, प्रमुख, आळंदी शहर, शिवसेना





