Pune District : समर्थच्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी
Pune District : सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेजची खेळाडू इशिता काकडे हिने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

आळेफाटा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत आयोजित विविध जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
फुलगाव-पुणे येथे झालेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेज, बांगरवाडी-बेल्हे संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. या कामगिरीच्या जोरावर विघ्नेश पवार, ओम रोकडे आणि चिराग झिंजाड यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेजची खेळाडू इशिता काकडे हिने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.
लोणी देवकर, ता. इंदापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत समर्थच्या महिला कुस्तीपटूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली. समृद्धी जाधव हिने 65 किलो, तन्वी जाधव हिने 72 किलो, तर समीक्षा माळी हिने 76 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला. नारायणगाव येथे झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये स्वरा लेंडे हिने, तर 200 मीटर धावण्यात ईश्वरी घोलप हिने द्वितीय क्रमांक मिळविला. 4400 मीटर रिले स्पर्धेत स्वरा लेंडे, प्रांजल येवले, श्रावणी चौधरी आणि समृद्धी शेळके यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. 400 मीटर हार्डल्समध्ये श्रावणी चौधरी हिने द्वितीय, तर समृद्धी शेळके हिने तृतीय क्रमांक पटकावला.
क्रिकेट, रायफल शूटिंग, कुस्ती आणि मैदानी क्रीडा अशा विविध प्रकारांत मिळालेले हे यश समर्थ शैक्षणिक संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाटचालीचे द्योतक ठरले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जि.प. सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वर्हाडी आणि अश्विनी जगदाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.





