सोनई, (वार्ताहर): – मुळा कारखाना कामगार व कामगार संघटनेचे वतीने श्रावण मासानिमित्ताने श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे अन्नदान करण्यात आले. प्रारंभी मुळा कारखान्याचे वर्क्स मॅनेजर पवार, चिफ केमिस्ट देशमुख ,वाबळे यांच्याहस्ते शनीदेवाला अभिषेक करण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले , सेक्रेटरी रितेश टेम ,चिफ इंजिनियर नवले, गाढे, देशमुख ,बारगळ, प्रशासन अधिकारी बानकर, युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार, सेक्रेटरी डी. एम. निमसे, खजिनदार सुभाष सोनवणे, विश्वस्त बाळासाहेब बोरूडे, छबुराव भुतकर, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले, प्रकाश जठार, शिवाजी घावटे ,मुळा कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, युनियनचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य व कामगार उपस्थित होते.