सोनई, (वार्ताहर)- सोनई ग्रामपंचायत व आरोग्य यंत्रणेमार्फत सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे साथीचे आजार डोके वर काढत आहे. मलेरिया, डेंगूसारख्या आजाराने दवाखाने हाऊसफुल दिसून येत आहे. गल्ल्याबोळांमध्ये डासाच्या औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे. येथील आरोग्ययंत्रणा सुस्त झाली असून, साथीचे आजार वाढत असताना ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य यंत्रणा कोमात गेली की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकचा पत्ता नसल्याने सर्वसामान्य माणसाची कामे खोळंबली आहे.साथीचे आजार वाढत असताना ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. वास्तविक पाहता सोनई ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी एकत्रित येऊन गावाचा कारभार व्यवस्थित चालवला पाहिजे. आज तसं पाहिलं तर सर्व ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सुनील गडाख यांनाच लक्ष द्यावे लागते मग आपण निवडून दिलेले ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचं काम काय आहे, अशी चर्चा गावामध्ये होत असताना याची चटके आपल्या नेत्यांना भोगावे लागतात. याची जाण ग्रामपंचायतच्या सदस्यांनी ठेवली पाहिजे. ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना मनापासून गावाचा विकास आणि गावाचं काम केले तर आपल्याही नेत्याचे हात बळकट होतात. त्यांचेही राजकारण सोयीस्कर होते, याची जाण सोनई ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ठेवली पाहिजे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आपली जबाबदारी सांभाळून आपल्या वरिष्ठ नेत्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असी कळकळीची विनंती सुभाष राख केली आहे.