Shanghai Masters 2024 : जोकोविचला हरवून सिनर ठरला विजेता…

Shanghai Masters 2024 (Jannik Sinner vs Novak Djokovic) :- अव्वल मानांकित जानिक सिनरने रविवारी शांघाय येथे 24 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोवाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करून शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
इटालियन खेळाडूने आठ एसेस ठोकून जोकोविचचा 7-6 (4), 6-3 असा पराभव केला. जोकोविचने चार एसेस मारले तर सिनरला एकाही ब्रेक पॉइंटचा सामना करावा लागला नाही.
🇨🇳🏆 JANNIK SINNER SHANGHAI CHAMPION! Beats Djokovic 7-6 6-3! 🙌
🇮🇹 Jannik in 2024:
65-6 (91.5%) ✅
2 Major titles 🇦🇺🇺🇸
3 Masters 1000s 🇺🇸🇨🇳
2 ATP 500s 🇳🇱🇩🇪
Leads ATP race by *3620* points 😳Best. Player. On. The. Planet. 🌍 pic.twitter.com/6KOfk1qZao
— Olly 🎾🇬🇧 (@Olly_Tennis_) October 13, 2024
जोकोविच येथे त्याच्या 100 व्या टूर लेव्हल जेतेपदासाठी प्रयत्न करत होता. पुरुष टेनिसमध्ये केवळ जिमी कॉनर्स आणि रॉजर फेडरर यांना शतकाचा टप्पा ओलांडता आला आहे. कॉनर्सने 109 तर फेडररने 103 टूर लेव्हल विजेतेपद पटकावले आहेत.
IND vs BAN 3rd T20 : भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; तिसऱ्या सामन्यासह मालिकाही 3-0 ने घातली खिशात…
सबालेंका वुहान ओपनची विजेती…
डब्लूटीयूतील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू आर्याना सबालेंकाने अंतिम फेरीत सातव्या मानांकित झेंग कियानवेनचा 6-3, 7-5, 6-3 असा पराभव करून सलग तिसऱ्या वर्षी वुहान ओपनचे विजेतेपद पटकावले. साबालेंकाचे या मोसमातील हे चौथे विजेतेपद आहे ज्यामध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.




