Shanghai Masters 2024 : सर्बियाच्या जोकोविचची उपांत्यपूर्व फेरीत धडक….

Shanghai Masters 2024 : – सर्बियाच्या नोव्होक जोकोविचने रशियाच्या रोमन सफीउलिनला पराभूत करताना शांघाय मास्टर्स ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बुधवारी झालेल्या लढतीमध्ये नोव्होक जोकोविचने रोमन सफीउलिनला ६-३, ६-२ असे सहज पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.
पहिल्या सेटमध्ये जोकोविचने घेतलेली आघडी शेवटपर्यंत टिकविली. त्याने एकदाही रोमन सफीउलिनला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ उंचावला. दुसऱ्या सेटमध्ये संयम आणि आक्रमण यांचा दुहेरी संगम साधला.
Arctic Open 2024 Badminton : ज्याची भीती होती तेच झालं; सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा…
उपांत्यपूर्व फेरीत जोकोविच समोर झेकियाच्या जेकब मेनसिकचे आव्हान असणार आहे. स्पर्धेत यापूर्वी जोकोविचने इटालीच्या फ्लॅव्हिओ कोबोलीचे आव्हान ६-१, ६-२ असे सरळ सेटमध्ये संपुष्टात आणले होते.





