IPL 2025 : ‘यंदा ‘हा’ संघ पटकावणार जेतेपद…’, शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, पाहा VIDEO

IPL 2025 Shane Watson Predicts RCB’s IPL 2025 Victory : आरसीबीने आयपीएल २०२५ मध्ये दमदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. गुरुवारी, २९ मे रोजी, पंजाब किंग्सविरुद्ध आरसीबी पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे. प्लेऑफच्या सुरुवातीबरोबरच क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंनी आपापल्या आवडत्या संघांची निवड सुरू केली आहे. याच क्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉट्सन याने आरसीबीला आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबल दावेदार मानले आहे.
विराट फायनलमध्ये ‘प्लेयर ऑफ द मॅच’ – शेन वॉटसन
शेन वॉट्सनने आपल्या भविष्यवाणीत म्हटले आहे की, आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली अंतिम सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरेल. त्याने आरसीबीच्या सध्याच्या फॉर्मवर आणि कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला आहे. कोहलीने या हंगामात जबरदस्त फलंदाजी करताना अनेक सामने एकहाती फिरवले आहेत, ज्यामुळे वॉट्सन यांच्यासह अनेक दिग्गजांनी आरसीबीला वजेतेपदाचे दावेदार मानले आहे.
आयपीएल २०२५ चा विजेता आरसीबी असेल – शेन वॉटसन
It really has been another incredible season of @IPL 💪🏻💪🏻💪🏻
The playoffs are truly going to be epic!! 💥💥
Here are my predictions for who I think is going to win IPL18.
Make your predictions on Wolf777 now.#watson #wolf777 #wolf777exchange #cricket #ipl18 #playoffs… pic.twitter.com/2faVKyI7jW— Shane Watson (@ShaneRWatson33) May 28, 2025
शेन वॉट्सने एक्सवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले की, “आयपीएल २०२५ चा विजेता कोण असेल? याबाबत मी खूप विचार केला आणि तो आरसीबी संघ असेल आणि सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू हा महान खेळाडू विराट कोहली असेल. यामागचे कारण असे की, मला वाटते की यंदा आरसीबीसाठी ही योग्य वेळ आहे. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना काही अडचणी आल्या, परंतु जोश हेझलवूडच्या प्लेऑफसाठी पुनरागमनामुळे मला वाटते की हे वर्ष त्यांच्यासाठी यशस्वी ठरेल.”
हेही वाचा – LSG vs RCB : गोलंदाजाच्या अपमानावर अश्विन संतापला, पंतला सुनावलं, काय आहे प्रकरण?
वॉट्सनच्या भविष्यवाणीमुळे आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साह –
आरसीबीने यंदाच्या हंगामात पंजाब किंग्सविरुद्ध मुल्लांपुर येथे झालेल्या सामन्यात शानदार विजय मिळवला होता, ज्याचा उल्लेख संघाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्येही केला आहे. आजच्या क्वालिफायर सामन्यासाठी संघाने जोश हेजलवुडला पुन्हा सामील करताना तुषाराच्या जागी संघात स्थान दिले आहे, ज्यामुळे गोलंदाजीला अधिक बळकटी मिळण्याची शक्यता आहे. वॉट्सनच्या या भविष्यवाणीमुळे आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आता सर्वांचे लक्ष गुरुवारच्या सामन्याकडे लागले आहे, जिथे आरसीबीला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पंजाब किंग्सला पराभूत करावे लागेल.





