‘शक्ती विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर; राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून आनंदोत्सव

पुणे – महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत ऐतिहासिक असे शक्ती विधेयक काल विधानसभेत एकमताने मंजूर झाले. आज विधानपरिषदेत देखील ते एकमताने मंजूर झाले. याच धर्तीवर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने पुणे येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शुक्रवारी (दि.24) सायं 6 वा. बालगंधर्व चौक येथे मिठाई वाटप करुन या निर्णयाचे स्वागत देखील करण्यात आले.
याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील यांचे हे विधेयक मांडल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन तर महाविकासआघाडी सरकारने दिलेला शब्द पाळला त्याबदल महाविकासआघाडी सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद मानले आहे.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करताना महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत हे शक्ती विधेयक एक सुरक्षा कवच ठरेल हा दृढ विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली आहे.





